शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

जिल्ह्यातील अतिक्रमणावर मंगळवारी निर्णय

By admin | Updated: February 1, 2015 23:03 IST

जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना

यवतमाळ : जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. यासाठी आता मंगळवारी बैठक घेतली जाणार असून जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीतूनच अतिक्रमण मोहिमेचा पुढील टप्पा ठरणार आहे. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात अतिक्रमण हटाव मोहीम १५ दिवसापूर्वी राबविण्यात आली होती. यवतमाळ नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपककुमार मीना यांच्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागातील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर पहिला टप्पा संपला. दरम्यानच्याच काळात मीना यांचा परिविक्षाधीन कालावधीही संपला. त्या ठिकाणी पूर्ववत मुख्याधिकारी रवींद्र पांढरे रुजू झाले. आता यवतमाळ शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा पांढरे यांच्या नेतृत्वात पार पाडला जाणार आहे. दुसरा टप्पा कोणत्या क्षेत्रात राबवायचा. त्यासाठी काय उपाययोजना करायच्या, लागणारे मनुष्यबळ, सुरक्षा यंत्रणा याबाबत विचारविनियम करण्यात येणार आहे. यासाठीच मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. यवतमाळ शहरासोबतच जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांना अतिक्रमण हटाव मोहिमेचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार नगरपरिषदांनी कोणती तयारी केली. त्याची अंमलबजावणी कधी होणार याबाबतही माहिती या बैठकीत जिल्हाधिकारी जाणून घेणार आहे. वणी, पुसद, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, पांढरकवडा, नेर नगरपरिषदा अतिक्रमण हटाव मोहिमेचा अहवाल सादर करणार आहे. अतिक्रमण असलेले रस्ते यात प्रामुख्याने घेतले जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारीला यात प्राधान्य राहणार आहे. रहदारी सुरळीत करण्यासोबत वाहन तळासाठी सुरक्षित पट्टे आखले जाणार आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून कुठल्या उपाययोजना असतील याचा आढावा नगरपरिषदेला सादर करावा लागणार आहे. (शहर वार्ताहर)