शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न

By admin | Updated: October 2, 2015 07:03 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर दोन तरुणांनी अत्याचाराचा

 यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर दोन तरुणांनी अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली. त्याचवेळी पोलिसांचे गस्तीपथक या परिसरात पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात दोन तरुणांना तत्काळ अटक केली आहे. या घटनेने मेडिकल परिसराची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. मेडिकल परिसरातील वसतिगृहात राहणारी एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर रात्री ९.१५ वाजता आपल्या ड्युटीवर जात होती. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत दोन तरुणांनी तिला पकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाने घाबरलेल्या डॉक्टरने आरडाओरडा केली. सुदैवाने त्याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे गस्त पथक त्या परिसरातून जात होते. हा प्रकार दिसताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत दोनही तरुण पसार झाले होते. याची माहिती वायरलेसवरून चार्ली पथकाला दिली. तसेच त्याच परिसरात असलेल्या काही डॉक्टरांच्या दुचाकी घेऊन मदनेसह इतर पोलिसांनी शोध सुरू केला. त्यावेळी आरोपी प्रवीण वासुदेव सोनवणे (२४), देवानंद देवराव भिवनकर (३०) दोघे रा. कोळंबी ता. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले. यातील प्रवीणने वयाच्या १५ व्या वर्षीच खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर देवानंदवर लुटपाटीच्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरला चाकूच्या धाकावर लुटल्याच्या घटनेपाठोपाठ आता महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २ आॅक्टोबरचा रुग्णालय प्रशासनाला अल्टीमेटम दिला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न झाल्यास कामबंद आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅन्डल मार्च काढून निषेध केला. विद्यार्थ्यांच्या दबावानंतर महाविद्यालय प्रशासनाला जाग आली असून मेडिकल पसिरात वाढलेली झुडूपे तोडण्यासाठी जेसीबी लावण्यात आला. सातत्याने एकाच ठिकाणी अशा हल्ल्याच्या घटना होत असल्याने प्रशासनाकडून आता वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)अधिष्ठाता व डॉक्टरच्या नावे ठाण्यात ‘साना’सदर प्रशिक्षणार्थी डॉक्टरला वैद्यकीय तपासणीसाठी महिला पोलीस कर्मचारी अपघात कक्षात घेऊन गेली असता तब्बल एका तासपर्यंत कुणीही तिकडे लक्ष दिले नाही. अधिष्ठातांनी घटनास्थळावर येण्याचे सौजन्य दाखविले नाही. उलट एक तासानंतर न्यायवैद्यक विभागातील डॉ. अविनाश वाघमोड हे तपासणीसाठी आले. त्यांनी यावेळी महिला पोलीस शिपायाशी असभ्य भाषेचा वापर केला. याची तक्रार अधिष्ठाता डॉ. राठोड यांच्याकडे केली असता त्यांनीही डॉक्टरची बाजू घेतली. तपास कामी सहकार्य मिळत नसल्याने एसडीपीओ राहुल मदने यांच्या सूचनेवरून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अधिष्ठाता व संबंधित डॉक्टरविरोधात साना नोंदविण्यात आला आहे. अधिष्ठाता म्हणतात, माझी जबाबदारी नाही मेडिकल परिसरात सातत्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर हल्ले होत आहे. सुरक्षेच्या मागणीचे निवेदन घेऊन महिला डॉक्टर अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड यांच्याकडे गेले. त्यावेळी अधिष्ठातांनी या विद्यार्थ्यांनाच खडेबोल सुनावत तुमच्या सुरक्षेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची नाही. तुमची सुरक्षा तुम्हीच करा, असे म्हटले. त्यामुळे प्रशिक्षणार्थी संतप्त झाले. सायंकाळी या डॉक्टरांंनी अधिष्ठातांना घेराव घालून जाब विचारला.