याद करो कुर्बानी : आमदारांच्या पुढाकारात युवावर्गाचा सहभागउमरखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘याद करो कुर्बानी’ कार्यक्रमांतर्गत आमदार राजेंद्र नजरधने यांच्या नेतृत्वात १९ आॅगस्ट रोजी शहरात तिरंगा यात्रा ही मोटारसायकल रॅली जल्लोषात काढण्यात आली. या रॅलीमध्ये युवा वर्गाने मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला. माहेश्वरी नाट्यगृहापासून रॅलीची सुरूवात झाली. पुसद रोडवरील हुतात्मा स्मारक येथे समारोप करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या विरांचे या निमित्ताने स्मरण करण्यात आले. भारत माता की जय आणि वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या रॅलीचा समारोप ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रंगरावजी देशमुख यांच्या सत्काराने झाला. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य आदेश जैन, गांधी, साकळे, शहराध्यक्ष महेश काळेश्वरकर, जिल्हा सचिव नितीन भुतडा, महिला आघाडी अध्यक्ष अल्का मुडे, जिल्हा सरचिटणीस योगिनी पांडे, रायेवार, मुडे, भंडारे, रमेश चव्हाण, सुनील टाक, डॉ. जवने, गुजरे, दर्शन अग्रवाल, दिलीप सुरते, डॉ. वीरेंद्र श्रीवास्तव, रितेश गिरी, युवा मोर्चा अध्यक्ष बबूल मैड, गौरव चंद्रवंशी, नितीन लोखंडे, गजानन मोहळे, मिथून श्रीवास्तव, अमोल चांदले, अविनाश जोशी, आत्मा समिती अध्यक्ष सतीश पाटील वानखेडे, दिलीप तिवारी, सुरेश दादा काळे, अतुल खंडारे, गजू लांबटिळे, शिवानंद कुंभकर्ण, स्वप्नील शुक्ला, रवी कदम, रणजीत रणमले, रवी जोशी, पिंटू शिंदे, सुदर्शन ठाकरे, मनीषा काळेश्वरकर, श्वेता जैन आदींनी तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)
उमरखेड येथे तिरंगा यात्रा जल्लोषात
By admin | Updated: August 21, 2016 01:32 IST