शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पेसा निधीतील कामांच्या खर्चाचे होणार ‘आॅडिट’, आदिवासी विकास विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 20:57 IST

आदिवासींचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्याकरिता विविध योजना राबविता याव्यात, यासाठी शासनाने अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत प्राप्त होणा-या ५ टक्के निधीतून केलेल्या कामांवरील खर्चाचे ‘आॅडिट’ केले जाणार आहे.

अमरावती : आदिवासींचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्याकरिता विविध योजना राबविता याव्यात, यासाठी शासनाने अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत प्राप्त होणा-या ५ टक्के निधीतून केलेल्या कामांवरील खर्चाचे ‘आॅडिट’ केले जाणार आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाने ४ आॅक्टोबर रोजी निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतींचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे.अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाचा ५ टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय २१ एप्रिल २०१५ रोजी शासन घेतला. त्यानुसार आदिवासी विकास विभागाने जिल्हा परिषदमार्फत ग्रामपंचायतींना ५ टक्के निधी विकास कामांसाठी वितरीत केला. मात्र, ग्रामसभा लेखे मधीेल नियम क्रमांक १४, १५ व १६ नुसार ठेवणे अनिवार्य आहे. तथापि, ग्रामपंचायतींनी पेसाअंतर्गत प्राप्त ५ टक्के निधीचा वापर ज्या विकास कामांसाठी केला त्या कामांच्या खर्चाचा लेखाजोखा व्यवस्थित ठेवला नाही. त्यामुळे पेसा अंतर्गत ५ टक्के निधीतून विकासकामे झाले अथवा नाही? हे खर्चाचे आॅडिट झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पेसाअंतर्गत वितरित झालेल्या निधी वाटपाची थेट राज्य शासनाने दखल घेतल्याने आता ग्रामपंचायतींचा ब्लडप्रेशर वाढला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी ज्या ग्रामपंचायती, स्थानिक वनव्यवस्थापन समिती यांचे एक वर्षात लेखा परीक्षण, स्थानिक निधी लेखा परीक्षा पथकाकडून झाले नसल्यास त्रयस्थ लेखा परीक्षकाकडून लेखा परीक्षण करून घेण्याचे बंधनकारक आहे. २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयान्वये पंचायतीने ग्रामसभेच्या मान्यतेचे ग्रामसभा कोषातून हाती घेतलेल्या सर्व कामांचे खर्चाचे लेखापरिक्षण सनदी लेखापाल यांच्यामार्फत दरवर्षी बंधनकारक आहे. पेसा अंतर्गत निधी वितरणातील विसंगती दूर करण्यासाठी खर्चाचे आॅडिट करण्याबाबतचे आदेश आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी गजानन देशमुख यांनी निर्गमित केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत