शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:55 IST

अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) इतर कोणत्याची जातींचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शनिवारी तालुक्यातील आदिवासी संघटना व समाज बांधवांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देपुसद एसडीओंना निवेदन : अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) इतर कोणत्याची जातींचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शनिवारी तालुक्यातील आदिवासी संघटना व समाज बांधवांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.येथील बिरसा मुंडा ब्रिगेड, आदिवासी कर्मचारी संघटना, आदिवासी विकास परिषद, आक्रोट संघटना, बिरसा क्रांती दल आदींच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा सुभाष चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, तहसील चौकमार्गे यशवंत रंगमंदिरावर पोहोचून तेथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. ‘एक तीर एक कमान-सर्व आदिवासी एक समान’ आदी घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आरक्षण आमच्या हक्काचं असल्याचे सांगितले. सभेत नेत्यांनी अनुसूचित जमातीमध्ये इतर कोणत्याही जातीच्या समावेशाला विरोध दर्शविला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गैरआदिवासीविरोधातील निकालाची कठोर अंमलबजावणीची मागणी केली.डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करावी, आदिवासींना वनजमिनीचे पट्टे द्यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, डॉ.हरिभाऊ फुपाटे, संदेश पांडे, रमेश उमाटे, संतोष माघाडे, फकीरराव जुमनाके, वाघोजी खिल्लारे, दादाराव चिरंगे, डॉ.आरती फुपाटे, राजू देवतळे, नामदेव इंगळे, सुरेश धनवे, अनंत माळकर आदींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात तालुक्यातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा