शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये वृक्षलागवड घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:33 IST

वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे.

ठळक मुद्देदहा लाखांचा खर्च : ५१ ग्रामपंचायतीत केवळ २० टक्के झाडे जिवंत

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत या बाबी पुढे आल्या आहे. प्रशासनाकडून सांगितल्या जात असलेल्या झाडांपैकी केवळ २० टक्के रोपांचे अस्तित्व तेवढे दिसत आहे.पंचायत समितीमार्फत वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. ५१ ग्रामपंचायतीला प्रत्येकी ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. झाडे जगविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन मजूर लावायचे होते. ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड आणि मजुरांसाठीचा खर्च झाल्याचे दाखविले. परंतु झाडांचे अस्तित्व कुठेही नाही. २० टक्के जिवंत झाडाच्या भरवशावर वृक्षलागवडीचा फार्स केला जात आहे.अडगाव ग्रामपंचायतीने ४०० झाडे लावली. यातील २५० जिवंत असल्याचा दावा करण्यात आला. यावर ४२ हजार ३५४ रुपये ८५ पैसे एवढा खर्च करण्यात आला. याच ग्रामपंचायतीने स्मशानभूमीतही ४०० झाडे लावली असल्याचे दाखविले गेले. २१ हजार ४८५ रुपये ७४ एवढा खर्च यावर करण्यात आला. या शिवाय बोरगाव ग्रामपंचायतीने २० हजार ९०५ रुपये, ब्राह्मणवाडा पश्चिम १४ हजार ३०० रुपये ६४ पैसे, चिकणी डोमगा ४० हजार ९४० रुपये ३२ पैसे, दहीफळ ४१ हजार ३० रुपये सात पैसे, दोनद ३४ हजार ७५२ रुपये ८४ पैसे, जवळगाव ५८ हजार ६६ रुपये ९८ पैसे, कोहळा ग्रामपंचायतीने १८ हजार २७१ रुपये ८४ पैसे एवढा खर्च वृक्ष लागवडीवर दाखविला आहे. या शिवाय मोझर, पांढरी, पाथ्रड गोळे, पिंपळगाव डुब्बा, रत्नापूर, शहापूर, शिरसगाव, सिंदखेड, टाकळी सलामी, उमर्डा, वटफळी या ग्रामपंचायतींनी २० हजारावर खर्च दाखवून निधी लाटला आहे.चिखली कान्होबा, चिचगाव, पांढरी या ग्रामपंचायतींनी ४०० झाडे लावण्यासाठी येत असलेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम खर्च झाल्याचे दाखविले आहे. सर्व ५१ ग्रामपंचायतींसाठी नऊ लाख ८१ हजार खर्च दाखविण्यात आला आहे. झाडांची संख्या कमी आहे. त्यावेळी खरंच एवढा खर्च वृक्ष लागवडीवर झाला असावा याविषयी संशयाला बळ मिळत आहे.पाणी टंचाईचा बहाणा, मजुरांसाठी निधी मात्र वापरलाबहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षलागवडीवर मोठी रक्कम खर्ची घातली आहे. झालेल्या कामाची पाहणी अधिकारीस्तरावर केली गेली. या अधिकाºयांना सर्वकाही ठिकठाक दाखविले गेले. प्रत्यक्षात झाडे दिसत नसताना अधिकाºयांनीही ‘पास’ करून टाकले. या कामांची देयके काढताना कमिशनबाजी झाल्याची शंका व्यक्त होत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने झाडे जगतील कशी, असा प्रश्न ग्रामसेवकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र झाडांना पाणी टाकण्यासाठी मजूर उपलब्ध करू देण्यात आले. यासाठी निधीही दिला. तरीही झाडे जगविता का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.