शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स उलटून १ ठार, १५ प्रवासी जखमी, वणीनजीक झाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 04:39 IST

समोरून येणा-या मोटारसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात चंद्रपूर-पुणे ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार, तर ट्रॅव्हल्समधील १५ प्रवासी जखमी झाले.

वणी (यवतमाळ) : समोरून येणा-या मोटारसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात चंद्रपूर-पुणे ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार, तर ट्रॅव्हल्समधील १५ प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास वणी-यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्यावर घडली.भरत वैद्य (४०) रा.झरपट, असे मृताचे नाव आहे. या अपघातातील जखमींपैकी अनुजा टिकेकर, वय ४० (रा.तुकूम चंद्रपूर), सतीश अघेल श्रीराममुल्ला (३१), संध्या सतीश श्रीराममुल्ला (२३) श्रेयश सतीश श्रीराममुल्ला (२) सर्व रा.घुग्घूस, नीलिमा कोहाड (३२), ममता कतरे (२५), डॉ.राजेश प्रभाकर गंटुवार (५०) सर्व रा.चंद्रपूर या सात प्रवाशांना जबर मार लागला. अनेकांना किरकोळ दुखापत झाली.चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एम.एच.२९-ए.डब्ल्यू ३३३३) चंद्रपूरवरून पुणेकडे जाण्यासाठी निघाली. वणीपासून पाच किमी अंतरावर पळसोनी फाट्याजवळ समोरून एम.एच.२९-ए.एच.९९१७ क्रमांकाची भरधाव मोटारसायकल आली.बसचालकाने या मोटारसायकलला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटारसायकलला धडक बसून त्यात मोटारसायकल चालक भरत वैद्य जागीच ठार झाला. त्यानंतर ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली.अपघाताची माहिती मिळताच, ग्रामीण रुग्णालय परिसरातील रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहचल्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, वाहतूक निरीक्षक संग्राम ताटे, पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.जखमींपैकी रुग्णवाहिकेद्वारे वणीच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुवार यांनी ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

टॅग्स :Accidentअपघात