शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
7
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
8
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
9
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
10
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
11
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
12
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
13
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
14
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
15
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
16
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
17
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
18
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
19
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
20
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

ट्रॅव्हल्स विमानापेक्षा महाग

By admin | Updated: November 2, 2015 01:48 IST

विमानापेक्षाही ट्रॅव्हल्सचे दर महाग, ऐकून धक्का बसलायना. मात्र हे सत्य आहे. यवतमाळातून पुण्याला खासगी बसने जायचे असल्यास ३२०० रुपये मोजावे लागते.

ट्रॅव्हल्सचे तिकीट ३२०० : नागपूर-मुंबई विमान प्रवास २५०० रुपये रूपेश उत्तरवार यवतमाळ विमानापेक्षाही ट्रॅव्हल्सचे दर महाग, ऐकून धक्का बसलायना. मात्र हे सत्य आहे. यवतमाळातून पुण्याला खासगी बसने जायचे असल्यास ३२०० रुपये मोजावे लागते. उलट नागपूरवरून मुंबईला विमानाने जाण्यासाठी केवळ २५०० रुपये लागतात. दिवाळी सणाच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांची अक्षरश: पिळवणूक चालविली आहे.दिवाळीच्या पर्वात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कॅश करण्यासाठी ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या प्रवासी दरात एकपट-दुप्पट नव्हे तर पाच पट दर वाढविले आहे. साधारणत: यवतमाळ-पुणे खासगी बसचे नियमित दर ७०० ते ९०० रुपये असतात. मात्र सध्या दिवाळीची गर्दी लक्षात घेता ५ नोव्हेंबरपासून दर वाढविले जाणार आहे. पुण्याहून यवतमाळकडे दिवाळीपूर्वी येण्याचे दर आणि दिवाळीनंतर पुण्याला ज्याचे दर २५०० रुपये, तीन हजार रुपये ते ३२०० रुपयेपर्यंत पोहोचले आहे. त्यातही अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग करावी लागत आहे. विशेष म्हणजे एसटी बसचे दर ९४० रुपयावरून ७४७ रुपये करण्यात आले आहे. यवतमाळ शहरातून पुण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. नियमित प्रवासी मिळत असल्याने एसी आणि नॉन एसी बसेसची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या काळात पुण्याला शिक्षणासाठी असलेली यवतमाळातील मंडळी शहरात येतात. रेल्वेची सुविधा असतानाही अनेक जण ट्रॅव्हल्सनेच येणे पसंत करतात. त्यामुळे या १५ ते २० दिवसात प्रवाशांची संख्या दहापटीने वाढते. त्यामुळे वाहने कमी आणि प्रवासी जास्त अशी स्थिती निर्माण होते. याचाच फायदा घेत काही वर्षांपासून ट्रॅव्हल्स मालक दिवाळीच्या काळात तिकिटांचे दर वाढवितात. मात्र गत दोन वर्षांपासून हे दर विमानालाही लाजविणारे आहे. नागपूर ते मुंबई विमानाचे दर २५०० रुपये आहे. त्या तुलनेत कमी अंतर असलेल्या यवतमाळ ते पुणेसाठी ३२०० रुपये मोजावे लागत आहे. एवढे असतानाही प्रवाशांच्या मात्र यावर उड्या पडत आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाची असते. मात्र खासगी ट्रॅव्हल्सचे दर किती असावे हे ठरविण्याचे अधिकार परिवहन विभागाला नसल्याचे सांगत त्यांनी हात वर केले. आरटीओंची नेमकी जबाबदारी काय हाच प्रश्न या आहे. तर या विरोधात कुणी तक्रार करायला पुढे येत नाही. निमूटपणे अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करताना दिसतात. ‘एसटी’ने केले पुण्याचे दर कमी, आरटीओचे हात वर दिवाळीच्या काळात वाढती गर्दी पाहून ट्रॅव्हल्स मालकांनी पाचपट तिकीट दर वाढविले आहे. उलट राज्य परिवहन महामंडळाने नियमित ९४० रुपये असणारे तिकीट या काळात जादा बससाठी ७४७ रुपये केले आहे. जादा बसेस यवतमाळ, वणी, नेर, दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा आगारातून सोडण्यात येणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दर किती असावे, ही बाब प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे या प्रकारात आरटीओ काहीही करू शकत नाही. प्रवाशांनीच अशा प्रकाराला लगाम घालावा. - एस.एस.झोडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी