शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कळंब बायपासवर वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:07 IST

भरधाव ट्रकने चिरडल्याने वाहतूक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना येथील कळंब बायपासवर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदुचाकीला फरफटले : नागरिकांनी दिला ट्रक चालकाला चोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भरधाव ट्रकने चिरडल्याने वाहतूक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना येथील कळंब बायपासवर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. तपासणीसाठी ट्रक न थांबल्याने त्याचा पाठलाग करताना दुचाकी ट्रकखाली आली.सय्यद करीमोद्दीन सय्यद बद्रुद्दीन उर्फ बब्बू (५२) रा. कोहीनूर सोसायटी भोसा असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते जिल्हा वाहतूक शाखेत जमादार पदावर कार्यरत होते. ते मंगळवारी सकाळी कळंब बायपासवर कर्तव्य बजावित होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नागपूरकडून आयशर ट्रक (क्र.एम.एच.४०-५६९९) कळंब बायपासवर आला. करीमोद्दीन यांनी या ट्रकला थांबविण्यासाठी इशारा केला. मात्र हा ट्रक भरधाव धामणगाव मार्गाकडे निघाला. त्याला थांबविण्यासाठी करीमोद्दीन यांनी आपल्या दुचाकीने पाठलाग केला. पाठलाग करताना ट्रकच्या बफ्फरमध्ये दुचाकी अडकली आणि करीमोद्दीन ट्रकच्या चाकाखाली आले. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरूपाचा मार लागून जागीच मृत्यू झाला.अपघाताचे दृश्य दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाणाºया ट्रक चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. म.जमील शेख आरीफ (३४) रा. यशोदानगर नागपूर असे चालकाचे नाव आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करणाºया वाहतूक पोलिसाचाच अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. सय्यद करीमोद्दीन यांचे पार्थिव पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. तेथे पोलिसांनी मानवंदना दिली. 

टॅग्स :Accidentअपघात