शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

वाहतूक शाखेत बदलीसत्राने शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

वणी शहरात वाहतूक शाखा निर्माण झाल्यापासून एकही अपघात घडला नाही. सोबतच नागरिक व बच्चे कंपनींना एकप्रकारची शिस्त लागली. मात्र एक महिन्यापासून या वाहतूक शाखेला ग्रहण लागले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून बदलीसत्र सुरू झाले.

ठळक मुद्देवाहतूक व्यवस्था कोलमडली : कोट्यवधींचा महसूल देणारी वणीची शाखा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चार वर्षात एक कोटी ४४ लाख ९५ हजाराचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करणारी वणीची वाहतूक शाखा बदलीसत्रात अक्षरश: रिकामी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे तैनात असलेल्या वाहतूक निरीक्षकासह दोन जमादार, दोन शिपाई व दोन महिला पोलीस शिपाई यांच्या शिरावर शहराच्या वाहतुकीची जबाबदारी येऊन पडली आहे.वणी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पाच वर्षांपूर्वी वणीत वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी या शाखेत २६ शिपाई, तीन महिला शिपाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक एवढा ताफा तैनात होता. त्यामुळे शहराच्या वाहतुकीला एक शिस्त लागली होती. या शाखेने शहरातील दोन मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू करून शहरातील वाहतुकीला दिशा दिली होती. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन दंडाच्या माध्यमातून मोठा महसूलही मिळत होता. सन २०१५ मध्ये २० लाख ५५ हजार ९०० रूपये, २०१६ मध्ये ३२ लाख दोन हजार ४०० रूपये, २०१७ मध्ये ३४ लाख १६ हजार ९०० रूपये, तर २०१८ मध्ये ४२ लाख ७४ हजार ६०० रूपये वार्षिक महसूल वणी वाहतूक शाखेने दंडाच्या माध्यमातून गोळा केला.जानेवारी ते जुलैर्पंत या शाखेने पाच हजार ८०९ केसेस करून १५ लाख ४५ हजार ८०० रूपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला. आतापर्यंत या विभागाने एक कोटी ४४ लाख ९५ हजार ६०० रूपये दंडाच्या माध्यमातून महसूल गोळा केला आहे. वणी शहरात वाहतूक शाखा निर्माण झाल्यापासून एकही अपघात घडला नाही. सोबतच नागरिक व बच्चे कंपनींना एकप्रकारची शिस्त लागली. मात्र एक महिन्यापासून या वाहतूक शाखेला ग्रहण लागले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून बदलीसत्र सुरू झाले. त्यात २४ पोलीस शिपाई, जमादारांची बदली जिल्हास्तरावर करण्यात आल्याने संपूर्ण वाहतूक शाखा रिकामी झाली आहे. सध्या या शाखेत दोन जमादार, दोन शिपाई व दोन महिला शिपाई कार्यरत आहे. त्यांपैकी एक महिला शिपाई प्रसुती रजेवर, तर दोन पोलीस शिपायांना यवतमाळ येथे परेडसाठी पाठविण्यात आले आहे. परिणामी सध्यातरी वाहतूक शाखेत शुकशुकाट दिसून येत आहे.शहरात वाहनांची संख्या मोठी असून खाती चौक ते अणे चौक हा एकेरी मार्ग रस्त्याच्या कामामुळे बंद आहे. त्यामुळे टिळक चौक ते सर्वोदय चौकापर्यंतची वाहतूक व्यवस्था जटील झाली आहे. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारे आॅटो स्थानिक टिळक चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक या परिसरात रस्त्याच्या कडेला ठाण मांंडून बसत असून त्यांच्यावर कुणाचाही अंकुश उरला नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.बदली सत्रामध्ये वणी वाहतूक शाखेतील पोलीस बळ कमी झाले आहे. शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी अतिरीक्त पोलीस दलाची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. ती लवकरच पूर्ण होणार आहे.- नंदकुमार आयरे,वाहतूक शाखा प्रमुख वणी

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस