शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीशिवाय केलेली बदली शिक्षा ठरते; ‘मॅट’चा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 16:09 IST

Yawatmal News शासकीय अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार असेल व त्याची चौकशी न करता बदली केली गेली असेल तर ती त्याच्यासाठी शिक्षा ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिला.

ठळक मुद्दे वित्त सहसंचालकांची बदली रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार असेल व त्याची चौकशी न करता बदली केली गेली असेल तर ती त्याच्यासाठी शिक्षा ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिला.राजेश गोपाल लांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्वाळा दिला. लांडे हे मुळ वित्त व लेखा विभागाचे सहसंचालक आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेंतर्गत समग्र शिक्षा अभियान मुंबई येथे होती. तीन आमदारांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांची बदली करण्यात आली होती.ते बदलीस पात्र नव्हते. या बदलीला त्यांनी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. यावेळी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला याचिकाकर्त्यांच्यावतीने देण्यात आला. शासकीय कर्मचाºयाविरूद्ध तक्रार असेल तर त्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देणे आवश्यक आहे, त्याची खातेनिहाय चौकशी, चार्जशीट झाली आहे का हे तपासणे बंधनकारक आहे. याशिवाय झालेली बदली त्या कर्मचाºयासाठी शिक्षा व अन्यायकारक ठरत असल्याचे ‘मॅट’ने स्पष्ट केले. लांडे यांची बदली आणि २४ जूनचा कार्यमुक्ती आदेश रद्द करून त्यांना ताबडतोब जुन्या जागेवर काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. आर.एस. आपटे, तर शासनाच्यावतीने मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मंचेकर यांनी काम पाहिले. याप्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर व अ‍ॅड. गायत्री गौरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

आमदारांचा विरोध अन् समर्थनहीया प्रकरणा तीन आमदार लांडे यांच्याविरोधात होते. त्यांचे काम चांगले नसल्याच्या तक्रारी केल्या. याचवेळी तीन आमदार लांडे यांच्या बाजूने होते. त्यांनी लांडे यांचे काम उत्तम असल्याचे पत्र दिले होते.‘मॅट’ने सांगितली मार्गदर्शक तत्त्वेराजेश लांडे प्रकरणाच्यानिमित्ताने ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी येथून पुढे बदली करायची असेल तर त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली. ४ बदलीचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळ व तेथून मुख्यमंत्र्यांकडे सादर करताना त्यात सुस्पष्टता असावी, विशिष्ट कारण नमूद असावे, विशेष बाब असेल तर नेमकी कशाच्या आधारे बदली करायची आहे ते नमूद असावे.बदलीला नागरी सेवा मंडळाची शिफारस आहे का, संबंधिताला बदलीवर पुढे नेमके कुठे देणार हे त्यात स्पष्टपणे नमूद असणे गरजेचे आहे. बदलीबाबत वेगळे धोरण ठरले असेल तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करावे, संबंधित जीआर, शासनाच्या बाजुचे न्यायनिवाडे जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.

टॅग्स :Governmentसरकार