लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे कोरोना आजाराबाबत प्रचंड काळजी घेतली जात असताना इतर आजारांबाबत मात्र प्रचंड दुर्लक्ष होत आहे. याच परिस्थितीचा फटका बसून शहरात एका बेवारस वृद्धेचा करुण अंत झाला. तिला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरले. मातृदिनीच एका आईची अशी दुखद अखेर झाल्याने यवतमाळकर हळहळले.महात्मा गांधी चौकात भिक्षा मागून बेवारस जगणाºया या वृद्धेच्या पायाला अनेक दिवसांपासून गंभीर जखम झालेली होती. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ललित जैन यांनी १३ एप्रिल रोजी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी उपचारही सुरू केले. पुढचे तीन-चार दिवस डॉक्टरांच्या सेवासुश्रूषेमुळे या वृद्धेची प्रकृती किंचित सुधारली. मात्र शारीरिक आजारासोबतच ती मानसिक आजारानेही ग्रस्त होती. त्यामुळे रुग्णालयात इतरांना शिव्या देणे, अन्न फेकून देणे असे प्रकार घडू लागले. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना त्रास होवू लागला.डॉक्टरांनी अखेर जैन यांना फोन करून या वृद्धेला परत घेऊन जाण्यास सांगितले.ललित जैन यांनी या वृद्धेला नागपूरच्या वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्याची तयारी केली. मात्र लॉकडाऊनमुळे नागपूरपर्यंत जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी गरजेची होती. त्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती केल्यावरही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या वृद्धेला पुन्हा गांधी चौकातच आणून सोडले गेले. जैन यांनी काही सामाजिक संघटनांतर्फे तिच्या जेवणाची सोय करून दिली.रात्रीचे जेवण घेण्यापूर्वीच घेतला निरोपमात्र शनिवारी प्रतिसाद फाऊंडेशनचे कार्यकर्ते तिच्यासाठी जेवण घेऊन आले. तेव्हाही ती निद्रिस्त होती. बराच वेळ उठली नाही. अखेर पोलिसांना सूचना देण्यात आली. रुग्णवाहिका बोलावून म्हातारीला शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उन्हाच्या जबर तडाख्यामुळे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सध्या तिचा मृतदेह शासकीय शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला आहे. तिच्या आप्तांचा पत्ता न लागल्यास आपण स्वत:च अंतिम संस्कार करणार असल्याचे ललित जैन यांनी सांगितले.
कोरोनाच्या शुकशुकाटात बेवारस वृद्धेचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST
महात्मा गांधी चौकात भिक्षा मागून बेवारस जगणाºया या वृद्धेच्या पायाला अनेक दिवसांपासून गंभीर जखम झालेली होती. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ललित जैन यांनी १३ एप्रिल रोजी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी उपचारही सुरू केले. पुढचे तीन-चार दिवस डॉक्टरांच्या सेवासुश्रूषेमुळे या वृद्धेची प्रकृती किंचित सुधारली. मात्र शारीरिक आजारासोबतच ती मानसिक आजारानेही ग्रस्त होती.
कोरोनाच्या शुकशुकाटात बेवारस वृद्धेचा करुण अंत
ठळक मुद्देमातृदिनीच एका आईचा मृत्यू : उन्हाचा बसला फटका, सामाजिक कार्यकर्त्यांची धावपळ ठरली निष्फळ