शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

गोरक्षणाच्या नावाखाली जनावरांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:47 IST

वणी ते घोन्सा मार्गावरील रासा येथे असलेल्या श्रीराम गोरक्षणमधून मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी जनावरांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. दोन दिवसांपूर्वी वरोरा पोलिसांनी या गोरक्षणात काम करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशी करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची चौकशी : अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी ते घोन्सा मार्गावरील रासा येथे असलेल्या श्रीराम गोरक्षणमधून मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी जनावरांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. दोन दिवसांपूर्वी वरोरा पोलिसांनी या गोरक्षणात काम करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशी करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. या संस्थेचा अध्यक्ष नरेश निकम मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती सापडला नाही. त्याने अटकपूर्व जामीन मिळविल्याची चर्चा असली तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. वरोरा पोलिसदेखिल याविषयात काही बोलायला तयार नाही.मुळचा वणी येथील रहिवासी असलेला नरेश निकम हा पूर्वी वीज कंत्राटदार होता. पुढे त्याने शक्कल लढवून वणी-घोन्सा मार्गावरील रासा गावालगत श्रीराम गोरक्षण या नावाने संस्था सुरू केली. बेवारस जनावरांची सेवा हा या संस्थेचा उद्देश होता. मात्र पुढे या उद्देशालाच हरताळ फासण्यात आला. या संस्थेच्या कार्यकारिणीत काही सामाजिक कार्यकर्त्यांना घेण्यात आले होते. मात्र या संस्थेत चालणाऱ्या गैरकारभाराची कुणकुण लागताच या सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपापल्या पदाचे राजीनामे निकमकडे दिले. मात्र त्याने ते राजीनामे धर्मदाय आयुक्ताकडे सादर केले की नाही, हा संशोधनाचा विषय आहे.२१ जानेवारीच्या पहाटे वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे जनावराने भरलेल्या एका टाटा पीक-अपने प्रकाश मेश्राम नामक वाहतूक पोलिसाला चिरडले. या घटनेनंतर रासा येथील श्रीराम गोरक्षण संस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी इम्तीयाज अहेमद फय्याज आणि मोहम्मद कुरेशी या दोघांना घटनास्थळावरून, तर मोहम्मद फहीम शेख व अदिल खान या दोघांना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून ताब्यात घेतले.या आरोपींनी तपासादरम्यान सदर जनावरे रासा येथील नरेश निकम यांच्या संस्थेतील असल्याचे सांगून त्यांनीच ही जनावरे तस्करीसाठी दिल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. त्यानंतर वरोरा पोलिसांनी श्रीराम गोरक्षणात काम करणाऱ्या अतुल गौरकार व पवन उरकुंडे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या प्रकरणात अटक होणार, या भितीने संस्थेचा अध्यक्ष नरेश निकम याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतल्याचे सांगण्यात येते.नरेश निकम करीत होता पायलटिंग२० जानेवारीच्या रात्री श्रीराम गोरक्षणातून वाहनांमध्ये जनावरे कोंबल्यानंतर या वाहनांना सुरक्षित जिल्हा पार करण्याची जबाबदारी स्वत: नरेश निकम याने घेतली होती. जनावरांना घेऊन ही वाहने वरोराकडे निघाल्यानंतर पुढे जाऊन या वाहनांची पायलटींग स्वत: नरेश निकम करत होता, असे पोलिसांनी सांगितले. मात्र खांबाडा येथे सदर वाहनाने वाहतूक पोलीस शिपायाला चिरडल्यानंतर नरेश निकम तेथून पळून गेला, अशीही माहिती मिळाली आहे.