शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली.

ठळक मुद्देसंचारबंदीचा फज्जा । गर्दी हटविण्यासाठी पोलीस कुमक रस्त्यावर उतरली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. असे असले तरी शनिवारी यवतमाळ शहरात संचारबंदी उठल्याचे चित्र काही तास कायम होते. शहरी भागातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर कुमक उतरविली. यानंतर शहरातील गर्दी नियंत्रणात आली.कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी करण्यात आल्या आहे. यानंतरही शहरातील नागरिक गर्दी करताना दिसतात. शनिवारी ही गर्दी प्रकर्षाने जाणवली. यवतमाळ शहरातील गांधी चौक, टांगा चौक, सरदार चौक, नेहरु चौक, मारवाडी चौक, दत्त चौक, आर्णी नाका या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी सकाळी पहायला मिळाली. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि काही दुकानदार आपली दुकाने नागरिकांसाठी खुले करीत होते. यातून शहरात संचारबंदी हटल्यासारखे चित्र पहायला मिळत होते. मारवाडी चौकात अक्षरश: वाहतूक ठप्प झाली होती. या चौकामध्ये दररोज वाहनांची प्रचंड गर्दी असते. अत्यावश्यक सेवा असल्यामुळे धान्य घेऊन येणारी वाहने आणि ग्रामीण भागात जाणाºया वाहनांची गर्दी या ठिकाणी पहायला मिळते. यासोबतच नागरिकांनीही या भागामध्ये आता गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस विभागाने सकाळपासून कंबर कसली. रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांना कशाला, कुठे बाहेर जात आहे याची विचारणा करण्यात आली. याचे संयुक्तीक उत्तर न मिळाल्याने वाहनधारकांचे वाहन जप्त करण्यात आले. टोर्इंग वाहनाच्या मदतीने ही वाहने वाहतूक शाखेने आपल्या मुख्यालयात जमा केली. त्यावर दंड आकारला. इतकेच नव्हे तर सायंकाळपर्यंत ही वाहने न देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या. यामुळे विनाकारण वाहनांची गर्दी करणाºया नागरिकांना चांगलाच चोप बसला. दुपारनंतर ही गर्दी ओसरली. दिवसभर वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच होती. नागरिक विविध कारणे पुढे करीत शहरात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताने शनिवारी नागरिकांना घरीच थांबावे लागले. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा करताच सायंकाळी पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसून आली.टांगा चौकावर कुणाचेच लक्ष कसे नाही ?जीवनावश्यक वस्तूंची दुकाने टांगा चौकामध्ये आहे. गोळ्या, बिस्कीटांपासून ते गहू, तांदूळ, दाळ, साखर ठोक विक्रीची दुकाने याच परिसरात आहे. या ठिकाणावरुन अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने दररोज ये-जा करतात. किती वाहनांना टांगा चौकात दर दिवसाला प्रवेश द्यावा, याचे कुठलेही नियोजन प्रशासनाकडे नाही. हा रस्ता अरुंद आहे. यासोबतच मोठे ट्रक सारखे ये-जा करतात. छोट्या वाहनांना जाण्यासाठी जागाच राहत नाही. अशा स्थितीत खेड्यांमधून धान्य खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक नसते. मुळात या सर्व गोष्टींचे नियोजन झाले तर या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडता येणार आहे. मात्र त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सर्व वाहने एकाच वेळी, एकाच दिवसी, एकाच ठिकाणी दिसतात. यातून संचारबंदीचा बट्ट्याबोळ होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी