शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पर्यटकांना ‘आर्ची’ खुणावतेय; तलाववालीला पाहण्यासाठीही गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

तलाववाली व आर्चीच्या दररोज होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह आहे. याठिकाणी येणारे पर्यटक आज मला आर्ची व तलाववालीचे दर्शन होईलच, असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी पडद्यावर सैराट फेम आर्चीने जशी रसिकांना मोहिनी घातली होती, तशीच टिपेश्वर अभयारण्यात असलेली आर्ची नामक वाघिण, तलाववाली वाघिण यांच्यासह पिलखानवाली, जंजीर, ट्रिकल नामक वाघिण सध्या आपल्या साईडिंगने पर्यटकांना मंत्रमुग्धच करीत आहे.

योगेश पडोळेलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील टिपेश्वर अभयारण्यातील जंगल सफारी दरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटक ‘आर्ची व ‘तलाववाली’ अशी ओळख असलेल्या वाघिणीची एक झलक पाहण्यासाठी अभयारण्यात गर्दी करीत आहेत. जंगलातील काही पाणवठ्यावर या ऐटबाज आर्ची वाघिणीसोबत तिचे तीन बछडे व तलाववाली वाघिणीसोबत तिच्या चार बछड्यांचे दर्शन पर्यटकांना हमखास होत आहे. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसह बच्चेकंपनीलाही व्याघ्रदर्शनाचा आनंद मिळत आहे.तलाववाली व आर्चीच्या दररोज होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह आहे. याठिकाणी येणारे पर्यटक आज मला आर्ची व तलाववालीचे दर्शन होईलच, असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी पडद्यावर सैराट फेम आर्चीने जशी रसिकांना मोहिनी घातली होती, तशीच टिपेश्वर अभयारण्यात असलेली आर्ची नामक वाघिण, तलाववाली वाघिण यांच्यासह पिलखानवाली, जंजीर, ट्रिकल नामक वाघिण सध्या आपल्या साईडिंगने पर्यटकांना मंत्रमुग्धच करीत आहे. देशभरात ओळख असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात तलाववाली आणि आर्ची या दोन वाघिण आहेत. वन विभागाने कागदावर तलाववाली वाघिण टी-२ तर आर्ची या  वाघिणीची टी-७ अशी नोंद घेतली आहे. या दोन्ही वाघिणींचे सध्या पर्यटकांना सहज दर्शन होत असून दिवसेंदिवस टिपेश्वर अभयारण्यात भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर लगतच्या आंध्रप्रदेशातूनही पर्यटक येथे येत आहेत. 

झुडुपातून बघते तेव्हा पसरते शांतता - सध्या टिपेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना आर्ची, तलाववाली नामक वाघिणीचे दर्शन होत आहे. जंगल सफारी दरम्यान पर्यटकांची जीप पुढे गेल्यावर हळूच आर्ची, तलाववाली या दोन्ही वाघिण झुडुपातून बाहेर निघत पर्यटकांच्या जीपकडे बघते. याप्रसंगी स्मशानशांतता पसरत असून तिच्या या अंदाजामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसह वन्यजीवप्रेमी सध्या खूश आहेत.

 

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ