शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

तंबाखूमुक्ती जाणार ‘लिम्का बुका’त

By admin | Updated: December 27, 2015 02:52 IST

‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने एकीकडे अंमली पदार्थांची लयलूट होत असतानाच जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र गावागावात हजारो गावकऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देणार आहेत.

तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिन : एकाच वेळी लाखो लोक घेणार शपथयवतमाळ : ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने एकीकडे अंमली पदार्थांची लयलूट होत असतानाच जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र गावागावात हजारो गावकऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देणार आहेत. नव्या वर्षात पदार्पण करताना जिल्ह्याला तंबाखूमुक्त जीवनाची भेट देणाऱ्या या उपक्रमाची ‘लिम्का बुका’तही नोंद होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग तंबाखूमुक्त शाळेसाठी वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आता सलाम बॉम्बे फाऊंडेशनचीही मदत घेतली जात आहे. गेल्या नवरात्रौत्सवाच्या काळात विशेष कृती आराखडा राबवून तब्बल १५१ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. आता २६ जानेवारीपर्यंत प्रत्येक शाळा आणि शाळेच्या क्षेत्रातील प्रत्येक माणूस तंबाखूपासून दूर जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी २३ डिसेंबरलाच सर्व केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांशी चर्चा करून ३१ डिसेंबर हा दिवस ‘तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जुन्या वर्षाला निरोप देताना दरवर्षीच मोठ्या प्रमाणात लोक व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे याच दिवशी व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अवधुत वानखडे आणि चंद्रबोधी घायवटे या शिक्षकांना तंबाखूमुक्त चळवळीचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याच माध्यमातून तंबाखूमुक्त संकल्प दिनाचा उपक्रमही राबविण्यात येत आहे. लिम्का बुक आणि इंडिया बुकच्या निकषानुसार दोन लाख लोकांनी एकत्र शपथ घेण्याची गरज आहे. मात्र, जिल्ह्यात साधारण तीन लाख लोक एकत्र शपथ घेण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व सलाम बॉम्बे फाऊंडेशनसह गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक जोरदार प्रयत्न करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ंसीईओंच्या आवाजात शपथ, ईओंचे गावकऱ्यांना आग्रहपत्रजिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळांमध्ये एकाच वेळी तंबाखूमुक्त जीवनाची शपथ घेतली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाजातील शपथ रेकॉर्ड करून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ती प्रत्येक शाळेत ऐकविली जाणार आहे. या संकल्प दिनाच्या कार्यक्रमात प्रत्येक गावकऱ्याने सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष यांना खास ‘आग्रहपत्र’ पाठविले आहे.तातडीने द्या अहवालतंबाखूमुक्त जीवनाच्या संकल्पाचा हा उपक्रम लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविला जाणार आहे. यासाठी सर्व शाळांकडून २ जानेवारीपर्यंत अहवाल मागविला आहे. ३१ डिसेंबरला शपथ घेणाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी खास ‘स्वाक्षरीपट’ शाळेला पाठविण्यात आला आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले आहेत.