शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतेय टिपेश्वर अभयारण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पांढरकवडा वन्यजीव विभागाची निर्मीती करून या विभागात टिपेश्वर अभयारण्य समाविष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाघाचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने पोषक वातावरण

प्रवीण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : वाघाच्या वाढत्या संख्येने टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांना खुणावत आहे. या अभयारण्यात वाघांचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने अतिशय पोषक वातावरण असल्याने भविष्यात हे अभयारण्य वाघ्रप्रकल्प म्हणून नावारूपास येणार आहे.केळापूर तालुक्यात टिपेश्वर नावाचे गाव होते. या गावात तिपाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. तिपाई देवीच्या नावावरून या अभयारण्याला टिपेश्वर असे नाव देण्यात आले. केळापूर आणि घाटंजी तालुक्यातील या अभयारण्याचा १४८.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तार आहे. वाघांची संख्या लक्षात घेता, आता या क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे आहेत. पांढरकवडा शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. अभयारण्याच्या वाटेवर केळापूर येथे जगदंबा देवीचे आणि चतुर्मुखी गणेशाचे अतीप्राचीन मंदिर आहे. तसेच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग अभयारण्याच्या जवळून जातो.टिपेश्वर अभयारण्यात वाघांच्या वास्तव्यशिवाय बिबट, हरीण, काळवीट, मोर, नीलगाय, रानडुकर याशिवाय विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. आंध्रप्रदेश तेलंगणापर्यंत या अभयारण्याची सीमा आहे. डोंगरदऱ्यांनी व्यापलेले हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे.वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पांढरकवडा वन्यजीव विभागाची निर्मीती करून या विभागात टिपेश्वर अभयारण्य समाविष्ट करण्यात आले. येत्या काही दिवसांतच टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे एका जाणकाराने ‘लोकमत’ ला सांगितले. त्यासाठी व्याघ्र गणना सुरू झाली आहे.अभयारण्यासाठी दोन गावांचे पुनर्वसन१ एप्रिल २०१४ ला पांढरकवडा येथे वन्यजीव विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. टिपेश्वर अभयारण्यातील बाधित गावांपैकी टिपेश्वर गाव व मारेगाव (वन) या दोन गावांची पुनर्वसनाची प्रक्रिया पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने ३ नोव्हेंबर २०१२ मध्ये पार पाडली. अलिकडे या अभयारण्यात वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ