शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

टिपेश्वर अभयारण्यात १४ वाघांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:20 IST

तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला.

ठळक मुद्देहमखास व्याघ्रदर्शन : गुलाबी थंडीत पर्यटकांची गर्दी वाढली

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात १४ पट्टेदार वाघाचे वास्तव्य असून यामध्ये एक नर वाघ, चार वाघिण आणि नऊ बछड्यांचा समावेश आहे. अभयारण्यात याशिवाय रोही, रानगायी, मोर, लांडोर, सांबर आदी विविध प्राणीसुद्धा या अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. नैैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या व १५ हजार हेक्टरचा विस्तीर्ण परिसर असलेल्या या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने संपूर्ण विदर्भातील पर्यटक या अभयारण्यात सफारीसाठी येत आहेत. सफारी करताना वाघासह अनेक प्राणीसुद्धा पहावयास मिळत असल्याने पर्यटक आनंदून जात आहेत. दक्षिण विदर्भात एकमेव असलेल्या या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे. यादृष्टीने सर्वस्तरातून प्रयत्नदेखील सुरू आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील क्षेत्र हे वाघाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे व सुरक्षित असे क्षेत्र आहे. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या अभयारण्यात पर्यटकांना सफारी करताना सोयीचे जावे, यासाठी अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी मेनगेटपासून व मादनी गेटपासून जीप्सी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत.सफारीसाठी आॅनलाईन बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे. टिपाईदेवी मंदिर परिसर, विविध पाणवठे, पिलखान नर्सरी या भागात आतापर्यंत अनेक पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. वाघांची संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांना आणखी आवश्यक सोईसुविधांची गरज असल्याचे वन्यजीवप्रेमींना वाटते.अभयारण्य मानवी हस्तक्षेपापासून दूरटिपेश्वर अभयारण्याच्या शेजारी असलेल्या गावातील रहिवासी वाघाच्या अधिवासात हस्तक्षेप करीत नाहीत. त्यामुळे या भागात वाघ व मानवामध्ये संघर्ष होताना दिसत नाही. प रंतु अभयारण्यात वास्तव्याला असलेल्या वाघिणींचे बछडे आता मोठे झाल्यामुळे ते जंगलाबाहेर निघू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ