शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर सुपीक माती विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:48 IST

आस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुर्ता मेटाकुटीस आला आहे. आता विकायलाही काही नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील सुपीक माती विटभट्टी चालकांना विकत असल्याचे महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात दिसत आहे.

ठळक मुद्दे दुष्काळाच्या झळा : विटभट्टी चालकांकडून मातीला मागणी

सदानंद लाहेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कबिजोरा : आस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुर्ता मेटाकुटीस आला आहे. आता विकायलाही काही नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील सुपीक माती विटभट्टी चालकांना विकत असल्याचे महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात दिसत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत अनेक विटभट्टीचालक कमी दराने माती खरेदी करीत आहे.महागाव तालुक्यावर गत पाच वर्षापासून दुष्काळाचे सावट आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी अपूूऱ्या पावसाने शेती उद्धस्त होत आहे. दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी अनेक घर खर्चासाठी अनेक शेतकºयांनी आपल्याकडील दागदागिणे विकले आहे. अनेक शेतकऱ्यांजवळ आता विकायलाही काहीच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काळ्या आईची सेवा करणाºया शेतकºयावर शेतातील माती विकण्याची वेळ आली आहे. महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरातील अनेक शेतकरी विट भट्टीचालकांना माती विकत आहे. शेतकऱ्यांच्या या गरजेचा फायदा घेत अनेक माती वाहतूक करणारे ठेकेदार तयार झाले आहे. शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत माती विकत घेऊन विट्टभट्टी चालकांना ज्यादा दरात विकली जात आहे. हा प्रकार सर्रास सुरु असून नाईलाजाने माती विकावी लागत आहे.शेतात निर्जीव माती शिल्लकआर्थिक विपन्नावस्थेमुळे शेतकरी आपल्या शेतातील माती विकत आहे. विटभट्टी चालक शेतातील सुपिक मातीचा वरचा थर घेऊन जात आहे. त्यामुळे निर्जिव माती शेतात शिल्लक राहते. या मातीत कोणतेही अन्नद्रव्य राहात नसल्याने पीक येण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.