शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात वाघिणीचा हल्ला कॅमेऱ्यात कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:04 IST

.शेतात चरत असलेल्या बैलावर वाघीण झडप घालते...हा थरार बुधवारी सुन्ना गाववासीयांनी अनुभवला. एकाने हा हल्ला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.

ठळक मुद्देसुन्ना गावालगत थरारएकाचवेळी पाच वाघ शिरले शेतात, हल्ल्यात बैल ठार

नीलेश यमसनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेले आणि टिपेश्वर अभयारण्याच्या सीमेवर वसलेले सुन्ना गाव...दुपारी ३.४५ वाजताची वेळ...अचानक एक वाघीण आणि तिचे चार बछडे गावालगतच्या शेतात एका शिरतात...शेतात चरत असलेल्या बैलावर वाघीण झडप घालते... हा थरारक प्रसंग पाहून तेथे काम करीत असलेल्या महिलांची भंबेरी उडते. गावकरी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यात यश येत नाही. अंगावर शहारे आणणारा हा थरार बुधवारी सुन्ना गाववासीयांनी अनुभवला. एकाने हा हल्ला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.सुन्ना येथील प्रवीण बोळकुंटवार या शेतकऱ्याचे सुन्ना येथे टिपेश्वर अभयारण्याच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ शेत आहे. बुधवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास शेताच्या धुऱ्यावरून एक वाघीण येत असल्याचे शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांना दिसली. या वाघिणीने धुऱ्यावर चरत असलेल्या बैलावर हल्ला चढविला. अकस्मात घडलेल्या या घटने महिला मजूर धास्तावले. त्यापैकी एका महिला मजुराने शेतमालकाला फोन करून वाघ शेतात शिरल्याचे सांगितले. शेतमालक प्रवीण बोळकुंटवार यांच्यासह गावातील शाहरूख खान, विजय एंबडवार, गजानन जिड्डेवार, महेश बोळकुंटवार, सोहन बोळकुंटवार, मारोती जिड्डेवार, अमित चिंतकुटलावार हे तातडीने शेतात पोहोचले. त्यावेळी वाघीण बैलाच्या अंगावर बसून असल्याचे त्यांनी बघितले. या सर्वांनी वाघाला हुसकावून लावण्याच्या उद्देशाने जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र धुऱ्याच्या दुसऱ्या बाजूने त्या वाघिणीचे चार बछडे उभे असल्याचे त्यांना दिसल्याने सर्वच घाबरून गेले. या सर्वांनी लगेच तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, वाघिणीच्या हल्ल्यात बैल ठार झाला. वाघांची संख्या अधिक असल्याने आम्ही बैलाला वाचवू न शकल्याची खंत प्रवीण बोळकुंटवार यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.दुसऱ्याही दिवशी वाघिणीचे दर्शनशिकार केल्यानंतर साधारणत: दुसऱ्या दिवशी वाघ शिकार खाण्यासाठी येतो. बुधवारी बैलाची शिकार केल्यानंतर गुरूवारी पहाटे ५ वाजता हल्लेखोर वाघीण पुन्हा शेतात शिरली. ती सकाळी ७ वाजेपर्यंत शेतातच ठाण मांडून होती. तिच्यासोबत तिचे चार बछडेही होते, अशी माहिती शेतमालक प्रवीण बोळकुंटवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Tigerवाघ