शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!, वीरकुंड शिवारातील थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 16:56 IST

वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला.

ठळक मुद्देएकाच रस्त्यावर दोन बैलबंड्या अडविल्या

वणी (यवतमाळ) : सायंकाळी पाच वाजताची वेळ... शेतातील कामे आटोपून एक शेतकरी आपल्या आई-वडिलांना बंडीत बसवून घराकडे परत येण्यासाठी निघाला. यावेळी बंडीच्या मागे एक तिसरा बैल बांधून होता. बंडी वीरकुंड शिवारात पोहोचताच एक ढाण्या वाघ अचानक झुडपातून बाहेर येऊन तो बंडीच्या चाकाजवळ खोळंबला.

वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. मात्र, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून त्या वाघाला हुसकावून लावले. शेतकऱ्याचे रौद्ररूप पाहून वाघाने किंचित माघार घेतली. मात्र, तो तास दीड तास रस्त्यावरच ठाण मांडून होता. मागाहून पुन्हा आलेल्या एका बैलबंडीलादेखील वाघाने अडवून ठेवले. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे.

मारेगाव कोरंबी येथील सचिन नागतुरे यांचे वीरकुंड शिवारात शेत आहे. सायंकाळी शेतीचे काम आटोपल्यानंतर ते त्यांच्या आई-वडिलांसह बैलबंडीने घराकडे परत येत होते. वीरकुंड शिवारात अचानक त्यांना वाघाने दर्शन दिले. केवळ दर्शनच नाही तर हल्ल्याच्या बेतात असलेल्या या वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सचिन नागतुरे यांनी मोठ्या धैर्याने उभारीचा धाक दाखवत वाघापासून बैलाचा बचाव केला.

वाघ बैलबंडीपासून २० फूट मागे सरकला. त्यानंतर त्याने त्याच रस्त्यावर ठाण मांडले. अर्ध्या तासानंतर नागपुरे यांच्या पाठोपाठ मारेगाव कोरंबी येथीलच संतोष काकडे हेदेखील त्यांच्या पत्नीसह बैलबंडीने याच मार्गे घराकडे परत येत असताना त्यांनाही या वाघाने दर्शन दिले. बैलबंडीपासून हा वाघ केवळ पाच फुटांवर बसून होता. मात्र, त्याने काही केले नाही. सावधगिरी बाळगत संतोष काकडे यांनी आपली बैलबंडी पुढे नेली आणि सुखरूप घर गाठले. या भागात सातत्याने व्याघ्रदर्शन होत असल्याने शेतीच्या कामावर परिणाम होत आहे.

मारेगाव (कोरंबी) भागात सातत्याने वाघाचा वावर

वणी-घोन्सा मार्गावर वणीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारेगाव (कोरंबी) शेतशिवारात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या भागात वाघाचा वावर आहे. त्यामुळे या परिसरातील गावकरी कायम दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. एखाद्या भागात वाघ दिसला तर आठवडाभर शेतीची कामे खोळंबतात. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी मारेगाव येथील सरपंचांनी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, वनविभागाने वाघाच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही.

टॅग्स :TigerवाघYavatmalयवतमाळenvironmentपर्यावरण