शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यात अद्याप वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाºया टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

ठळक मुद्देटिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर । ऐन पीक काढणी हंगामात शेतकऱ्यांपुढे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यातीलवाघाची दहशत अद्यापही कायम असून शेतकऱ्यांच्या गुराढोरांवर सतत हल्ले होतच आहे. मागील महिन्यात नरभक्षक झालेल्या वाघिणीला जेरबंद केले असले तरी टिपेश्वर अभयारण्यातील इतर वाघ आता बाहेर येऊन शेतकºयांच्या गुरांवर हल्ला करित आहे.तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाऱ्या टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर परिसरात वाघाची दहशत संपुष्टात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु टिपेश्वर अभयारण्यातील इतर वाघ आता बाहेर निघून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले करित आहे. गेल्या दोन दिवसात वाघाने गायी व गोºह्यावर हल्ला करून त्यांना ठार मारल्यामुळे पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पीक काढण्याचा हंगाम असून सोयाबीन काढणे व कापूस वेचणीची कामे सुरू आहे. त्यांना त्यामुळे रोज शेतात जावे लागते. परंतु अभयारण्याला लागून असलेल्या शेतात शिरून वाघ केव्हा हल्ले करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. चोपण शिवारात येत असलेल्या तलावावर वाघ पाणी पिण्यास येत असून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले करित आहे. त्यामुळे पशुपालकांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.कुंपनाची गरजटिपेश्वर अभयारण्याला लागून मोठ्या प्रमाणावर शेती आहे. त्यामुळे या अभयारण्यातून बाहेर पडलेले वाघ शेतात येतात. त्यातून संघर्ष वाढत आहे. त्यामुळे वनविभागाने जंगलाला कुंपन घालावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :TigerवाघTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य