शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यात वाघ वाढले

By admin | Updated: March 21, 2017 00:09 IST

टिपेश्वर अभयारण्य हे वाघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र आहे. अभयारण्यात सद्यस्थितीत असलेल्या वाघांची संख्या पाहता ...

सुरक्षेच्या उपाययोजनाच नाही : व्याघ्र प्रकल्प घोषित होण्याची प्रतीक्षा नरेश मानकर पांढरकवडाटिपेश्वर अभयारण्य हे वाघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र आहे. अभयारण्यात सद्यस्थितीत असलेल्या वाघांची संख्या पाहता विदर्भातील पेंच, ताडोबा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच टिपेश्वर अभयारण्यालाही व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची गरज निर्माण झाली आहे़ टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देऊन इतीकर्तव्य संपले, अशी भूमिका घेऊन शासनाने अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे़टिपेश्वर अभयारण्याकरिता शासनाने कोणतीही आर्थिक तरतुद केलेली नाही़ जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यापुर्वी १० वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो़ त्यात दरवर्षी कोणती कामे करावयाची, याचे नियोजन करण्यात येते़ टिपेश्वरबाबत मात्र असे काहीही करण्यात आले नाही़ अभयारण्याकरिता विभागीय वन अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे़ परंतु अभयारण्याचा सर्व कारभार पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून चालविला जातो़ पेंच व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे शासनाचा सर्व निधी तिथेच आहे़ पांढरकवडा व घाटंजी तालुक्यात येणारे हे अभयारण्य १४८.२९ चौरस किलोमीटर व्यापले आहे. परंतु एवढ्या मोठ्या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी केवळ २२ कर्मचारी कार्यरत आहेत़ नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या अभयारण्यात वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ वृक्ष आहेत़ वनऔषधीही मोठ्या प्रमाणावर आहेत़ १२ ते १४ पट्टेदार वाघांसह बिबट, रोही, रानगायी, कोल्हे, सारस, मोर, लांडोर, अस्वल, रानमांजर, नीलगाय, वानरे व इतर प्राण्यांची तसेच विविध प्रकारच्या पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे़ अनेक ठिकाणी जिवाश्म आढळतात. देशी- परदेशी स्थलांतरीत पक्षीही मोठ्या प्रमाणावर अभयारण्यात येतात. त्यामुळे पर्यटनाची फार मोठी संधीही या ठिकाणी आहे. अभयारण्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे येथील पट्टेदार वाघ. आतापर्यंत अनेकांना या वाघांनी दर्शन दिले आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. या अभयारण्याला लागूनच मोठ्या प्रमाणावर शेती आहे. अनेकदा या शेतात शिरुन वाघांनी गायी व बैलांचा पडशा पाडला आहे. अलिकडच्या गेल्या चार-पाच वर्षात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या अभयारण्यातील चार पट्टेदार वाघांचा मृत्यु झाला़ सुन्ना गावाजवळ एका पट्टेदार वाघाचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यु झाला, तर बोथ बहात्तर या गावाजवळ शिकाऱ्याच्या फासात अडकून एक पट्टेदार वाघ मृत्युमुखी पडला़ त्यानंतर अभयारण्यातील पिलखान नर्सरीजवळ एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला़ काही दिवसांपुर्वीच एका पट्टेदार वाघीणीच्या शिकारीचा प्रयत्न झाला होता. यामुळे या प्राण्यांची सुरक्षा करण्यास पेंच व्याघ्र प्रकल्प पुर्णत: अपयशी ठरला आहे़ आंध्रप्रदेशाच्या सिमे पर्यंत पसरलेल्या या अभयारण्यात वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केल्या जात आहे़अभयारण्याचा विकासच नाही१९७७ पासून आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात अभयारण्याचा विकासच झाला नाही. गेल्या काही वर्षात वाघ आणि इतर प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाघांच्या सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याची नितांत गरज असल्याने टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित होणे गरजेचे झाले आहे. पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे नदीतून वन्य प्राण्यांची व मौल्यवान वृक्षांची तस्करी होत आहेत़ अभयारण्याच्या चारही बाजूला चौक्या असल्या तरी किती चौकीदार उपस्थित राहतात हा संशोधनाचा विषय आहे़. टिपेश्वर अभयारण्याअंतर्गत एकुन १४ बिट आहेत.