शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वाघ आला रे आला.. पण वनविभाग उशिरा आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

टिपेश्वरमध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे वाघ गावांमध्ये धडक देत आहेत. कोपामांडवी-अंधारवाडी या गटग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये तर वाघ थेट लोकांच्या घरापर्यंत येत असल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंधारवाडीच्या शिवारात लोकांना वाघ दिसला. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. परंतु, कर्मचारी पोहोचले नाही. रात्री हा वाघ गावात शिरला.

ठळक मुद्देअंधारवाडीत वाघाचा मुक्तसंचार : ‘जनवन’चे २२ लाख खर्चच होईना, टिपेश्वरलगतच्या गावांची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जंगलालगतच्या गावात गेल्या दीड महिन्यांपासून वाघ वारंवार शिरकाव करीत आहे. शनिवारीही तेथे वाघाने चक्क गावभर ‘गस्त’ घातली. पण गावकऱ्यांनी फोन केल्यावरही वनविभागाचे पथक मात्र वेळेवर पोहोचले नाही. विशेष म्हणजे, वाघापासून संरक्षणासाठी येथे २२ लाखांचा निधी मिळूनही वनविभाग खर्चच करीत नसल्याची ओरड आहे.पांढरकवडा तालुक्यातील कोपामांडवी, अंधारवाडी, कोब्बई, सुन्ना, सावंगी ही गावे टिपेश्वर अभयारण्यालगत आहेत. टिपेश्वरमध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे वाघ गावांमध्ये धडक देत आहेत. कोपामांडवी-अंधारवाडी या गटग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये तर वाघ थेट लोकांच्या घरापर्यंत येत असल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंधारवाडीच्या शिवारात लोकांना वाघ दिसला. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. परंतु, कर्मचारी पोहोचले नाही. रात्री हा वाघ गावात शिरला. जवळपास तीन तास तो गावातच होता. गावकऱ्यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. मात्र वनविभागाचे कर्मचारी रात्री १०.३० वाजता पोहोचले, तोपर्यंत वाघ दाट जंगलाकडे गडप झाला होता.- वरातीमागून घोडेअभयारण्यालगतच्या ५ किलोमीटर परिसरातील गावांसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतून दरवर्षी २५ लाखांचा निधी येतो. मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्याची तो वापरणे आवश्यक आहे. अंधारवाडी, कोपामांडवी या गावांसाठीही निधी आलेला आहे. मात्र तो खर्च होत नसल्याचा गावकºयांचा आरोप आहे. वाघाच्या धुमाकूळाबाबत वन्यजीव विभागाकडे तक्रार केली की ते प्रादेशिक वनविभागाकडे बोट दाखवितात. मात्र डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा निधी वन्यजीव विभागाकडे असल्याने प्रादेशिक वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही, असे गावकºयांचे म्हणणे आहे. दरम्यान, शनिवारी वाघ दिसल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाºयांनी रविवारी गावात बैठक घेऊन गावकºयांना केवळ शाब्दिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक वन विभागाचे कर्मचारी तातडीने धावून येतात. मात्र वन्यजीव विभागाचे कर्मचारी येत नसल्याची गावकºयांची ओरड आहे.रात्री हा वाघ बापूराव पेंदोर यांच्या थेट घरापर्यंत आला होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. जनवन विकास योजनेचे २२ ते २५ लाख रुपये वनविभागाकडे दरवर्षी येतात. मात्र आमच्या गावात ते खर्चच केले जात नाही. वाघ व इतर वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी हा पैसे खर्च होणे आवश्यक आहे.- हनमंतू कायपेल्लीवार,सरपंच, कोपामांडवी-अंधारवाडी१ तारखेला माझ्या शेतात वाघ दिसला. पगमार्क दाखवूनही वनविभागाने कार्यवाही केली नाही. पुन्हा ३ दिवस तो वाघ माझ्या शेतात राहिल्याने पिकाचेही नुकसान झाले. तेव्हा गावाला सौरकुंपण, रस्ता अशा सोयी देण्याचे आश्वासन वन विभागाकडून देण्यात आले. मात्र अद्याप कोणतीच सोय झाली नाही.- व्यंकटेश दडांजे, उपसरपंच, कोपामांडवी-अंधारवाडी

टॅग्स :TigerवाघTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य