शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वणी परिसरात वादळाचे थैमान

By admin | Updated: May 27, 2014 01:12 IST

तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळाने थैमान घातले. यात एक गाय ठार झाली, तर शिंदोला, परमडोह व कोलगाव परिसरातील अनेक घरांची छप्परे उडाली. तालुक्यात रविवारी

वणी : तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळाने थैमान घातले. यात एक गाय ठार झाली, तर शिंदोला, परमडोह व कोलगाव परिसरातील अनेक घरांची छप्परे उडाली. तालुक्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळाला सुरूवात झाली. त्यात परमोडह येथील विनोद बावणे, भाऊराव डवरे व देवराव काकडे यांच्या घरांवरील टिनांची छपरे वादळाने उडवून नेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. सोबतच रोहिणीचा दमदार पाऊस आल्याने घरातील सामानांची झाकाझाक करण्यासाठी कुटुंबाची तारांबळ उडाली़ उडालेली टिनांची छपरे इतर घरावर जाऊन पडल्याने त्यात नजिकच्या काही घरांचे नुकसान झाले़ योगेश शंकर येलेकार यांच्या जर्सी गायीवर टिनाचे छप्पर कोसळल्याने गायीची मानच कापली गेली व २५ हजार रूपये किंमतीची गाय जागीच मृत्यूमुखी पडली़ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तालुक्यात रोहिणीचा दमदार पाऊस आला. तत्पूर्वी वादळ सुटले होते. सोसाट्याचा वारा वाहत होता. वणी शहरातही वादळाने जनजीवन विस्कळीत झाले. सोबतच विजांचा कडकडाटही सुरू होता. पावसाचे पहिलेच नक्षत्र असलेल्या रोहिणीने शहरात दमदार हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली होती. रात्र झाल्यामुळे रस्त्यांवरील वर्दळ रोडावली होती. मात्र रात्री घरी परतणार्‍या व्यावसायीकांना वादळ आणि पावसाचा तडाखा बसला. या वादळाची महसूल प्रशासनाला माहिती देण्यासाठी परमडोह येथील सुरेश काकडे यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला़ मात्र कुणीही त्याची दखल घेतली नसल्याचे काकडे यांनी सांगितले़ या वादळामुळे कोलगाव परिसरातही तारांबळ उडाली. वादळामुळे शिंदोला ते कैलासनगर मार्ग प्रभावीत झाला होता. रा रस्त्यावर काही झाडे पडल्याने वाहतूक ठप्प पडली होती. कोलगाव परिसरातील आठ घरांची पडझड झाली. मोहदा येथील जिल्हा परिषद शाळेवरील तीन खोल्यांचे छप्पर उडाले. त्यात जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले. नवी सावंगी येथील महादेव धांडकी यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. चारगाव चौकी येथील सुनील पिदुरकर यांच्या चहाच्या टपरीवरील छप्परही उडून गेले. वणी शहरालगत लालगुडा परिसरात विद्युत तारा लोंबकळल्याने सरपंचांनी भ्रमणध्वनीवरून महावितरणला माहिती दिली. मात्र महावितरणच्या संबंधित अभियंत्यांनी त्यांनाच उद्धट उत्तर देण्यात आले. त्यामुळे महावितरणप्रती असंतोष खदखदत आहे. या वादळामुळे तालुक्यात सर्वत्र नुकसान झाले. मात्र नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप कळला नाही. तथापि किमान पाच लाखांच्यावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. महसूलने नुकसानीची पाहणी करून गावकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)