शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:01 IST

जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनदी-नाल्यांंना पूर : दोघांचा वाहून गेल्याने मृत्यू तर एक बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला.गत महिनाभरापासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासीयांना सोमवारी पावसाने क्षणभरही उसंत न घेता अक्षरश: चिंब केले. रात्रीपासूनच पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. अनेक गावांंना या पुराचा फटकाही बसला. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात गुड्डू अनिल आगलावे (१८) आणि विनोद लक्ष्मण शिलार (३५) वाहून गेले. त्यांचे सोमवारी सकाळी प्रेतच आढळून आले. वणी तालुक्यातील पेटूर नाल्यात वाहून गेलेल्या सुनील सुभाष भोयर या तरुणाचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही.उमरखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. रविवारी सुमारे तीन तास दहागाव व पळशी फाट्यावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पोफाळी येथे वृक्ष कोसळल्याने पुसद-उमरखेड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मुकुटबन ते पाटणबोरी या मुख्य मार्गावरील वाहतूक बंद होती. पिंप्रडवाडी, बहीलमपूर, राजूर, हिरापूर या गावांशी असलेला संपर्क पुरामुळे तुटला होता. अनेक घरांची पडझड झाली. यवतमाळ शहरातही दिवसभर पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरण्याच जलपातळीत काही अंश वाढ झाली.२४ तासात २१.१२ मिमी पाऊसरविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात २१.१२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस मारेगाव तालुक्यात ५६.८० टक्के नोंदविला गेला. त्या खालोखाल वणी ४१.५०, उमरखेड ४०.५७ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस दारव्हा, बाभूळगाव या तालुक्यात नोंदविला गेला.