शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

आर्णी, यवतमाळ, घाटंजीत तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार १९० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यातील सहा हजार ८३८ जण बरे झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात ५५९ कोरोना अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ५४३ जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्या आले आहे. रविवारी २९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला

ठळक मुद्देकोरोनाचा कहर : ९५ रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचे मृत्यूसत्र आता सर्वत्र पसरत असून रविवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला. यात यवतमाळातील ५८ वर्षीय, घाटंजी शहरातील ५५ वर्षीय पुरुष आणि आर्णी तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या २५५ झाली आहे.रविवारी जिल्ह्यात आणखी ९५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात ६९ पुरुष व २६ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ९५ रुग्णांपैकी तब्बल ४९ रुग्ण एकट्या यवतमाळातील आहे. त्यात शहरातील ३० पुरुष, १६ महिला आणि तालुक्यातील दोन पुरुष, एका महिलेचा समावेश आहे. शिवाय आर्णी एक, बाभूळगाव एक, दारव्हा चार, दिग्रस चार, कळंब सहा, महागाव १२, पांढरकवडा एक, पुसद दोन, राळेगाव एक, उमरखेड एक, वणी १२ तर झरी जामणीतील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार १९० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यातील सहा हजार ८३८ जण बरे झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात ५५९ कोरोना अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ५४३ जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्या आले आहे. रविवारी २९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जिल्ह्यातील ७२ हजार ७६६ नागरिकांचे स्वॅब नमुने आजपर्यंत तपासणीसाठी पाठविले. त्यातील ७१ हजार ७०२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ६३ हजार ५१२ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर अद्यापही १०६४ नमुन्यांचे अहवाल येण्याची वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला प्रतीक्षा आहे. एकंदर २५५ नागरिकांचे बळी गेल्याने प्रशासनही आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहे. तर नागरिकांच्या मनातही धास्ती निर्माण झाली आहे.२९६ जणांना सुटीएकीकडे कोरोना रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून पूर्णपणे मुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी जिल्ह्यातील तब्बल २९६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत एकंदर ६ हजार ८३८ जणांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या