शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

तिघे निलंबित, आणखी १५ जणांचा प्रस्ताव

By admin | Updated: January 31, 2016 02:35 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

आरोग्य विभाग : निलंबनाला विरोध, दोन आठवड्यांचा ‘अल्टीमेटम’यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तिघांना निलंबित करण्यात आले असून १२ जणांचा प्रस्ताव तयार आहे. या विरोधात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने आंदोलन पुकारले असून प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सूडभावनेतून कारवाई होत आहे. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येते. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आरोग्य केंद्रांच्या भेटीचा सपाटा लावला. तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेवून कारवाई करण्याचे प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे पाठविले. याच आधारावर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले, तर १२ जणांचा प्रस्ताव आहे. मुळात वाढत्या लोकसंख्येनुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीच करण्यात आलेली नाही. डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित नाही. अशा स्थितीत कारवाईचा सपाटा अन्यायकारक असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेश चव्हाण यांनी सांगितले. या आंदोलनाला नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेनेसुद्धा पाठिंबा दिला. शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पदनिर्मिती करावी त्यानंतरच कर्मचाऱ्यांकडून कामाची अपेक्षा करावी, अशी मागणी अशोक जयसिंगपुरे यांनी केली. मॅग्मो संघटनेने डीएचओ बैठकीवर बहिष्कार टाकला. आता प्रशासनाला १५ दिवसांचा अवधी दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)