शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुन्हा डेल्टा विषाणू संसर्गाचे तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत यवतमाळ तालुक्यातील हादगाव येथे एक, कापरा मेथोड येथे एक, जगदीपूर येथे पाच, दिग्रस तालुक्यात देवार्जी पाच, सेवानगर एक व पुसदमध्ये एक रुग्ण आढळला होता. हे रुग्ण उपचार घेवून बरे झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. तर उपचारादरम्यान माहूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आता नव्याने नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा येथे एक आणि महागाव येथे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जगाने धास्ती घेतलेल्या डेल्टा विषाणू संसर्गाचा प्रकोप यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाला आहे. यापूर्वी शासकीय रुग्णालयात १५ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता पुन्हा तीन नवे रुग्ण आढळले आहेत. महागाव तालुक्यातील रुग्णालयात दोन तर नेर  रुग्णालयात एक रुग्ण आढळला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत यवतमाळ तालुक्यातील हादगाव येथे एक, कापरा मेथोड येथे एक, जगदीपूर येथे पाच, दिग्रस तालुक्यात देवार्जी पाच, सेवानगर एक व पुसदमध्ये एक रुग्ण आढळला होता. हे रुग्ण उपचार घेवून बरे झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. तर उपचारादरम्यान माहूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आता नव्याने नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा येथे एक आणि महागाव येथे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.डेल्टा विषाणू संसर्ग हा कोरोनापेक्षाही भयंकर मानला जातो. सद्यस्थितीत मेडिकलच्या डाॅक्टरांनी डेल्टा संसर्ग असलेल्या रुग्णावर यशस्वी उपचार केले आहेत. डेल्टा विषाणूची संसर्ग पसरविण्याची क्षमता कोरोनापेक्षा दुप्पट मानली जाते. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असतानाच डेल्टा विषाणूचा कहर येतो की काय अशी भीती व्यक्त केली जात असल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. उपाययोजना कायम ठेवण्यावर  भर दिला जात आहे. जिल्ह्याच्या तालुकास्तरावरील रुग्णालयांमध्येही ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयातही ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. बालकांवर अतिदक्षता उपचार करणाऱ्या कक्षांची निर्मिती करण्यात येत आहे. एकंदरच आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दर १५ दिवसांनी डेल्टा संशयित रुग्णाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले जात आहेत. या विषाणूच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेला बराच अवधी लागतो. विविध प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच डेल्टा विषाणू संसर्ग झाल्याचे उघड होते. त्यामुळे प्रत्येकानेच सतर्क राहणे गरजेचे आहेत.

महागाव व नेर तालुक्यात सर्वेक्षणडेल्टा विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी महागाव आणि नेर तालुक्यांमध्ये सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. शुक्रवारपासून ही मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. लाट येण्यापूर्वीच संसर्गाची साखळी कशी तोडता येईल यावर आरोग्य यंत्रणा काम करत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या