शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

विदर्भात आणखी तीन दिवस सूर्य आग ओकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भातील बहुतांश भागात १० मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने हवामान अंदाजानुसार वर्तविली आहे. या काळात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहे.तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ३ या ...

ठळक मुद्देउष्णतेची तीव्रता वाढणार ‘गरज असेल तरच बाहेर पडा’ चा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भातील बहुतांश भागात १० मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने हवामान अंदाजानुसार वर्तविली आहे. या काळात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहे.तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ३ या वेळात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पीत राहावे, फक्त हलक्या रंगाचे सुती कापडाचा वापर करावा, घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा, मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे टाळावे, शिळे अन्न खाणे टाळावे, उन्हात काम करताना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावा, चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे. ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शीतपेयांचे भरपूर सेवन करावे, प्राण्यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवा. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करा. ओल्या कपड्याने त्यांना पुसत रहा. डोक्यावर थंड पाणी टाका. ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शीतपेय द्यावे. ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. व्यक्तीला त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरु करणे गरजेचे आहे. कारण उष्माघात घातक ठरू शकते, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ