शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

तीन दोस्तांची ‘एक्झिट’ चटका लावून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:54 IST

एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पावतात.

ठळक मुद्देशहर हळहळले : दोघांवर पांढरकवडात तर एकावर उमरखेड येथे अंत्यसंस्कार

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पावतात. काही क्षणात घडलेल्या या घटनेतून पांढरकवडावासी अद्यापही सावरले नाहीत. रविवारी पहाटे ऐन पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेने मृतांच्या कुटुंबीयांसह सारे शहरच हादरून गेले आहे.शहरातील श्यामनगरीत राहणारा सिद्धेश हा वांजरी येथील देवराव गेडाम आश्रमशाळेतील ज्येष्ठ शिक्षक विकास मोगरकर यांचा मुलगा. आदर्श हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी बाळासाहेब राठोड यांचा मुलगा.तर संचेतन हा पांढरकवडातील कृषी केंद्राचे संचालक श्यामकिरण राठोड यांचा मुलगा. हे तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते. आदर्श व संचेतन हे दोघे येथील गुरूकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे पाचव्या वर्गाचे विद्यार्थी. तर सिद्धेश हा इरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकत होता. सुटीच्या दिवशी हे तिघेही ग्रीनपार्क वसाहतीजवळ असलेल्या राधेनगरी परिसरात आपापली सायकल घेऊन फिरायला यायचे. या परिसरात शासकीय कार्यालयाच्या नवीन इमारतीची कामे सुरू आहेत. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे काम पाच-सहा महिन्यांपूर्वीच झाले. बांधकाम सुरू असताना सिमेंट काँक्रीटचे मिश्रण तयार करण्यासाठी १८ ते २० फुटांचा खड्डा खोदण्यात आला होता. हाच खड्डा या तिन्ही बालकांसाठी काळ ठरला.खड्ड्यात पावसाचे पाणी आता शिगोशिग भरलेले होते. त्यातील मासे पाहत असताना सिद्धेश व आदर्श अचानक तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्या पाठोपाठ संचेतनहीा पडला. मदतीला कुणीच नसल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेसाठी कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. इतरही कायदेशीर सोपस्कर पार पाडले जातील. परंतु ही बालके पुन्हा परत येतील का, हा प्रश्न सर्वांनाच छळत आहे.आई.. खेळायला जातो!सिद्धेश, आदर्श आणि संचेतन ही तिन्ही मुले रविवारी सुट्टी असल्याने सकाळीच घराबाहेर पडले. जाताना प्रत्येकाने आईला सांगितले, ‘आई.. खेळायला जातो.’ आईनेही नेहमीप्रमाणे ‘लवकर ये’ म्हटले असेलच. पण एकदा गेलेले हे तिघेही आलेच नाही. आली ती वाईट वार्ता. सिद्धेश व आदर्शवर पांढरकवड्यात तर संचेतनवर मूळ गाव दिंडाळा ता. उमरखेड येथे अंत्यसंस्कार झाले.