शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पाणलोट योजनेत तीन कोटींचा भ्रष्टाचार

By admin | Updated: March 23, 2017 00:27 IST

गावागावात सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊन खेडी समृद्ध व्हावी या उदात्त हेतुने

माहितीच्या अधिकारातून घोटाळा उघड : दहा गावांमध्ये पाझर तलाव कागदावरच पुसद : गावागावात सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊन खेडी समृद्ध व्हावी या उदात्त हेतुने केंद्र शासन व राज्य शासन मोठ्या प्रमाणात पाणलोट विकास योजना राबवित आहे. मात्र जनसामान्यांच्या हिताच्या या योजनेला काही संस्था हरताळ फासून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानताना दिसून येत आहे. असाच खळबळजनक प्रकार पुसद तालुक्यात माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आला. येथील एका स्वयंसेवी संस्थेने दहा गावातील पाझर तलाव केवळ कागदावर दाखवून तब्बल दोन कोटी ८० लाख ३९ हजार १०० रुपये दडपल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुसद तालुक्यातील वडसद, मारवाडी बु., मारवाडी खु., नाणंद खु., इनापूर, आमदरी (ई), वसंतवाडी, सावरगाव गोडे, पिंपळगाव (ई), नानंद (ई) या दहा गावांमध्ये सदर संस्थेला शासनाकडून पाणलोट विकास योजनेअंतर्गत विकासात्मक कामे करावयाची होती. २००३ ते २०१० या कालावधीत ही कामे करावयाची होती. मात्र संस्थेने प्रत्यक्षात पाणलोट विकासाची कामे न करता केवळ कागदावर पाझर तलाव दाखवून जवळपास तीन कोटी रुपयांची देयके हडपली. ही बाब येथील सेवानिवृत्त गृहपाल एस.के. राठोड यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली. त्याच्या तक्रारीनुसार व तालुक्यातील एका स्वयंसेवी संस्थेने १० गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे न करताच कोट्यवधी रुपये हडप केल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये वडसद येथे २४ लाख ८० हजार ३०० मारवाडी बु. येथे २४ लाख ८४ हजार ८००, मारवाडी खु. येथे २५ लाख ३४ हजार ५००, नानंद खु. येथे २६ लाख २७ हजार २००, इनापूर येथे २२ लाख ६२ हजार ५००, आमदरी येथे २४ लाख ८३ हजार ८००, वसंतवाडी येथे २४ लाख नऊ हजार ४००, सावरगाव गोरे येथे २४ लाख २५ हजार ६००, पिंपळगाव ई २५ लाख ५६ हजार ९००, नानंद ई. येथे २१ लाख ९१ हजार ९०० असे एकूण दोन कोटी ८० लाख ९०० रुपयांची देयके उकळली. विशेष म्हणजे सदर संस्थेने तयार केलेले पाणलोट प्रकल्प संबंधित गावच्या ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करून याबाबतचा ग्रामसभेचा ठराव घेणे अनिवार्य होते. मात्र तसे कुठेही झाले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सेवानिवृत्त गृहपाल एस.के. राठोड यांनी केली आहे. (प्रतिनिधी)