कळंब नगरपंचायत : वरचढ कोण ठरणार ? पतीराज की पत्नीगजानन अक्कलवार कळंबकाही मतदार संघात रक्ताच्या नात्यात निवडणूकीची धुमचक्री रंगात आली. तर काही ठिकाणी पती आणि पत्नीच्या उमेदवारीमुळे जोरदार रंगत भरली आहे. पत्नी विजश्री खेचुन आणणार की पतीराज वरचढ ठरतो, याकडे आता कळंब येथील जनतेचे लक्ष लागले आहे. येथील वेगवेगळया प्रभागातून तीन दाम्पत्य रिंगणात आहेत. विशेष म्हणजे तीनही जोडपे वेगवेगळ्या पक्षाकडून जनतेला साद घालीत आहे. सिध्देश्वर वाघमारे २० वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व करीत आहे. यावेळी ते प्रभाग ६ मधून राष्ट्रवादीकडून रिंगणात आहे. त्यांची पत्नी रिता सिध्देश्वर वाघमारे या प्रभाग ११ मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार आहे. विशेष म्हणजे दोघांही पती-पत्नीला पंचवार्षिकमध्ये जनतेने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले होते. ते दोघे यावेळीही नगर पंचायतीच्या निवडणुकीत आपले भाग्य अजमावित आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या या दाम्पत्याविरुद्ध भाजपानेही एका दाम्पत्याला उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुध्द प्रभाग ६ मध्ये ओमप्रकाश भवरे तर प्रभाग ११ मध्ये प्रज्ञा ओमप्रकाश भवरे रिंगणात आहे. विशेष म्हणजे दोन्ही पती-पत्नींची ही लढत आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली आहे. कोणते दाम्पत्य कोणावर भारी पडते, याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे. प्रभाग ९ मध्ये राजेंद्र वानखडे भाजपाच्या तिकीटावर आपली ताकद अजमावित आहे. तर त्यांची पत्नी संगीता राजेंद्र वानखडे या प्रभाग १४ मध्ये भाजपाच्याच तिकीटवर इतर पक्षाच्या उमेदवारांना लढा देत आहे. कोणत्या दाम्पत्याला जनता पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले.
तीन जोडपे निवडणूक मैदानात
By admin | Updated: October 30, 2015 02:18 IST