शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

बसमध्ये चढताना साडेतीन लाखांच्या मुद्देमालावर हात साफ

By विशाल सोनटक्के | Updated: May 18, 2024 19:54 IST

एकाच दिवशी घडल्या दाेन घटना : अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंद

यवतमाळ : बसमध्ये चढत असताना चाेरट्यांनी पर्समध्ये ठेवलेल्या साेन्याच्या दागिन्यांसह राेख रक्कम असा एकूण ३ लाख ४८ हजार ७७९ हजारांच्या मुद्देमालावर हात साफ केला. चाेरीच्या दोन घटना एकाच दिवशी यवतमाळच्या बसस्थानकात घडल्याने खळबळ उडाली आहे. एक घटना २९ एप्रिल राेजी घडली आहे. उन्हाळ्यात बसमध्ये प्रवाशांची गर्दी राहत असल्याने महिला चाेरट्यांच्या टाेळीकडून या गर्दीचा फायदा घेतला जातो. या चाेरट्यांना अटक करण्यात पाेलिसांना अद्याप यश आलेले नाही.

विनाेद काळे (५९, रा. सिद्धेश्वरनगर) हे बसमध्ये चढत असताना चाेरट्यांनी हातचलाखीने लेदरच्या बॅगमध्ये ठेवलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, एटीएम कार्ड, १५ हजार रुपये किमतीची तीन साेन्याची नाणी, ओमचे लाॅकेट, राेख २६००, असा एकूण २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी घडली. दुसऱ्या घटनेत महिलेच्या पर्समधून २ लाख ७२ हजार २७९ रुपये किमतीचे साेन्याचे दागिने लंपास केले. ही घटना २९ एप्रिल राेजी घडली. महिला बसने पांगरी गावी पाेहोचल्यावर चाेरीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी मीनाबाई अशाेक मांजरे (५६, रा पांगरी, आर्णी) या महिलेने शुक्रवारी अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. सदर महिला आर्णी-जवळा बसमध्ये चढत असताना चाेरट्यांनी पर्समध्ये ठेवलेले दागिने हाताेहात लंपास केले. यात दाेन लाख सहा हजार ४०९ रुपये किमतीच्या ४२ ग्रॅम साेन्याची पाेत, दाेन ग्रॅम छाेटे मंगळसूत्र, सात ग्रॅम साेन्याचे टाॅप्स अशा दागिन्यांचा समावेश आहे. आशाताई माणिकराव गलाट (५३, रा. मुंगसाजीनगर, जांब राेड) या बसमध्ये चढत असताना चाेरट्याने पर्समधील १८ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम अंगठी, १५ हजारांची पुणेरी नथ, २० हजारांची चार ग्रॅम गळ्यातील चेन व राेख रक्कम असा ५३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. दाेन महिला व एका पुरुषाने अवधूतवाडी पाेलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून अनाेळखी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. चाेरी राेखण्यात अपयशबसमध्ये चढत असताना चाेरट्यांची टाेळी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधून, तर पुरुषांच्या खिशातून मुद्देमाल लंपास करत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह तगडा पाेलिस बंदाेबस्त ठेवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही चाेरट्यांना अटक करण्यासह चाेरीच्या घटना राेखण्यात यश आल्याचे दिसत नाही

टॅग्स :Yavatmalयवतमाळ