शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

जिल्हा परिषद सदस्यांची नाराजी थांबेना !

By admin | Updated: January 8, 2016 03:09 IST

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांची प्रशासनाप्रती असलेली नाराजी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

प्रशासनावर रोष : उपक्रम चांगले पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची खंत यवतमाळ : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांची प्रशासनाप्रती असलेली नाराजी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या सदस्यांचा अधिकाऱ्यांच्या एककल्ली कारभारावर रोष आहे. प्रशासनाचे उपक्रम चांगले व समाजहिताचे असले तरी ते लोकप्रतिनिधींना अंधारात ठेऊन राबविले जात असल्याची खंत अनेक सदस्य बोलून दाखवित आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सत्तेची दीड वर्षे लोटली आहे. मात्र या काळात सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर समाधान अभावानेच पहायला मिळाले. मुळात प्रशासन व पदाधिकारी असा वाद छुप्या पद्धतीने काही महिन्यांपासून धुमसतो आहे. तो विझविण्याऐवजी मान-अपमानाच्या काही घटनांमुळे तो आणखी पेटतो आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ४० किमीची पायदळ यात्रा काढली. तेव्हापासून या वादाबाबत उघड प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. या पदयात्रेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांना प्रशासनाने सहभागी करून न घेतल्याची ओरड आजही ऐकायला मिळते. या ‘उपक्रमाची’ चर्चा सुरू असतानाच तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिनी पदयात्रेची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जाते. या संकल्प दिनाची पदाधिकारी व सदस्यांना कल्पनाच दिली गेली नसल्याचा राष्ट्रवादीच्या गोटातील सदस्यांचा सूर आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधातील एककल्ली कारभाराचा आरोप आता आणखी उघडपणे सदस्य करू लागले आहेत. जिल्हा परिषदेतील शासकीय उपक्रम पदाधिकाऱ्यांनाच प्रशासन सांगत नसेल तर सामान्य सदस्यांची खरच प्रशासन किती किंमत करीत असेल असा सवाल एका सदस्याने उपस्थित केला. अध्यक्षांनी विविध विभागांना आकस्मिक भेटी देऊन लेटलतिफ कर्मचाऱ्यांची अनेकदा झाडाझडती घेतली. ही लेटलतिफी निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रशासनाने ‘टाईट’ भूमिका न घेतल्याने आजही लेटलतिफी कायम असल्याचे सांगितले जाते. सदस्यांनी अध्यक्षांकडे नाराजी बोलून दाखविल्यानंतर पदाधिकारी व प्रशासनाची समन्वय बैठक पार पडली. त्यात चर्चा होऊन प्रशासनाच्यावतीने चूक कबूल करण्यात आली. मात्र तेवढ्या बाबीने सदस्यांचे समाधान झालेले नाही. तंबाखू विरोधी दिनाच्या पत्रावर अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षरीचा मुद्दाही गाजतो आहे. भाजपा सरकार स्वच्छ भारत अभियान राबवित असताना शौचालय अनुदानातील गावांची संख्या अर्ध्यावर आणली गेली. डिजीटल स्कूलला वीज भारनियमन आणि इंटरनेट कनेक्शन तथा स्पीडचा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रारही सदस्यांनी बोलून दाखविली. (जिल्हा प्रतिनिधी)