शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या मृत्यूप्रकरणी हजारो विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:27 IST

तीन निरागस बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर ३०४ भाग २ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन मंगळवारी पांढरकवडा शहरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तीन निरागस बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर ३०४ भाग २ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन मंगळवारी पांढरकवडा शहरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. काढण्यात आलेल्या मुकमोर्चात शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.सिद्धेश मोगरकर, संचेतन राठोड व आदर्श राठोड या तिघांचा रविवारी येथील राधेनगरी परिसरातील खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र या कारवाईने पांढरकवडावासीयांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मंगळवारी शहरातून मुकमोर्चा काढण्यात येऊन मृत बालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा फलक हाती घेऊन शिस्तीने हा मुकमोर्चा सकाळी १०.३० वाजता मित्र मंडळाच्या क्रीडांगणावरून निघाला. शहरातील बिरसा मुंडा चौक, डायमंड चौक, मेन चौक, तहसील चौकमार्गे पुन्हा मित्र क्रीडा मंडळाच्या मैदानावर पोहोचला. याठिकाणी मृत सिद्धेश मोगरकर, आदर्श राठोड व संचेतन राठोड या बालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरवासीयांतर्फ गुरूकुलचे प्राचार्य विजय देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दोषींवर कडक कारवाई करा : एसडीओंना निवेदनमुकमोर्चाचा समारोप झाल्यानंतर एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी एस.भुवनेश्वरी यांना निवेदन दिले. तीन बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. खड्डा खोदणाऱ्या बांधकाम कंपनीच्या मालकावर पोलिसांनी ३०४ अ हा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाला किरकोळ प्रकरण बनविले असल्याचा उल्लेख सदर निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणात कंत्राटदारावर ३०४ भाग २ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व उद्भवणाऱ्या परिस्थितीला आपण स्वत: जबाबदार राहाल, असा इशारा या निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाStudentविद्यार्थी