शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रस्त्यांची हजारो कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:27 IST

जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी एक हजार ४३ कोटी, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी एक हजार १६० कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी एक हजार ८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी : वणी-वरोरा सेक्शन चौपदरीकरणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी एक हजार ४३ कोटी, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी एक हजार १६० कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी एक हजार ८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात रस्त्यांची हजारो कोटी रुपयांची कामे सुरू असून त्यातून रस्त्यांचे जाळे विणले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.वणी येथे राष्ट्रीय महामार्ग ९३०, वरोरा-वणी सेक्शनचे चौपदरीकरण आणि पिंपळखुटी येथील अतिरिक्त दुपदरी ओव्हरब्रीजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा.डॉ.अशोक उईके, राजू तोडसाम, माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक एम.चंद्रशेखर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा शहराध्यक्ष रवी बेलूरकर उपस्थित होते. यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात दहा हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आले आहे. वणी शहरातील दोन किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ना.गडकरी यांनी सांगितले.