शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या तूर, चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:53 IST

गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आली. सोमवारी सकाळी यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देडाळ विकली, पाकिटे फेकली : शेकडो क्विंटलचा गैरप्रकार दडपण्याचा प्रयत्न, पुरवठा विभागाला विक्रेत्यांचे आव्हान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आली. सोमवारी सकाळी यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे रेशनची लाखोंची तूरडाळ खुल्याबाजारात विकल्या गेल्याचे स्पष्ट होत असून ही पाकिटे फेकणारा विक्रेता शोधण्याचे आव्हान पुरवठा विभागापुढे आहे.स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वाईप मशिनचा वापर होत आहे. मात्र आता या स्वाईप मशिनवरही विक्रेत्यांनी जालीम उपाय शोधला आहे. त्याची साक्ष या रिकाम्या पाकिटांनी दिली. स्वस्त धान्य विक्रेत्यांच्या ‘चोरवाटा’ही यानिमित्ताने उघड झाल्या आहेत.गरिबांना स्वस्त दरात डाळ मिळावी म्हणून पुरवठा विभागाने तूरडाळ आणि चणाडाळीचा पुरवठा सुरू केला आहे. रेशन दुकानातून वितरित झालेली डाळ रेकॉर्डवर यावी म्हणून स्वाईप मशिनचाही वापर केला जात आहे. विक्री करण्यात आलेली तूरडाळ आणि चणाडाळ स्वाईप मशिनवर आली आहे. मात्र ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचली नाही. म्हणूनच डाळीची रिकामी पाकिटे जंगलात फेकली गेली.‘जनहित’ची दक्षतायवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरी जंगलाच्या वाटेवर डाळीची ही रिकामी पाकिटे फेकली गेली. जनहित माझे गाव संघटनेचे अध्यक्ष विलास झेंडे, नरसिंग आडे, प्रवीण ढोकळे, सुप्रित गणवीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा प्रकार सोमवारी निदर्शनास आला. त्यांनी तातडीने याची प्रशासनाला खबर दिली.पूर्वी लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभागामार्फत विविध साहित्य वाटप केले जात होते. हे साहित्य लाभार्थी कमी दरात गावात विकत होते. यातून गावातील धनधांडग्यांचाच लाभ झाला. तसाच प्रकार आता डाळीमध्ये होत आहे. शेकडो क्विंटल तूरडाळ आणि चणाडाळीची अशाच पद्धतीने विल्हेवाट लावली गेली आहे.दुप्पट नफ्यासाठी लढविली शक्कलस्वस्त धान्य दुकानातून विक्री झालेले तूर आणि चणाडाळीचे पाकीट ग्राहकांनी खरेदी केले. ते पाकीट पुन्हा दुकानदारांनी कमी दरात खरेदी केले. खरेदी झालेले तूर आणि चणाडाळीचे पाकीट रिकामे करून खुल्या बाजारात विकले गेले. त्यावर डबल नफा कमविला आहे. खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपये किलो आहे. तर स्वस्त धान्य दुकानात ही डाळ ५० रूपये किलोने विकली जात आहे. यामुळे तूरडाळीतून विक्रेत्यांना क्विंटलमागे तीन हजारांचा नफा होणार आहे. त्यासाठीच हा गैरप्रकार झाला आहे. चणाडाळ बाजारात ६५ रूपये किलो आहे. तर स्वस्त धान्य दुकानात ४० रूपये आहे. क्विंटलमागे दीड हजार रूपयांचा नफा मिळतो. कमी वेळात अधिक नफा मिळविण्यासाठी हा गोरखधंदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तूरडाळ मिळाली नाही, अशी तक्रार अजूनही नाही. हा काय प्रकार आहे, हे कसे घडले, याची चौकशी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर थेट कारवाई होईल.- शालीग्राम भराडीजिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ