शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:09 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना चार ते सहा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या मागे आगामी उन्हाळ्यासाठी पाण्याची बचत असे सोज्वळ कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुढे केले जात आहे.

ठळक मुद्देठिकठिकाणी पाईप लाईन फुटली : उन्हाळ्यापूर्वीच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना चार ते सहा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या मागे आगामी उन्हाळ्यासाठी पाण्याची बचत असे सोज्वळ कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुढे केले जात आहे. तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा सर्रास अपव्यय होत आहे. या विसंगतीला प्राधिकरणच जबाबदार असल्याचा आरोप उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती करावी लागणाºया यवतमाळकर नागरिकांमधून केला जात आहे.निळोणा आणि चापडोह प्रकल्पामध्ये ८५ टक्के जलसाठा आहे. असे असले तरी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. गत वर्षभरापासून पाणीटंचाईचा सामना यवतमाळकरांना करावा लागत आहे.धरणात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्राधिकरणाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच पाण्याची भीषण स्थिती शहरात निर्माण झाली आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर पाईप लाईन फुटली आहे.विशेष म्हणजे, वर्षभरापासून शहरातील विविध भागात दररोज पाईप फुटत आहे. यामुळे पाणीपुरवठा करणाºया पाईप लाईनची चाळणी झाली आहे. यातून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणाला याची वारंवार सूचना दिल्यानंतरही पाईपलाईन दुरूस्त होत नाही. उलट फुटणाºया पाईपलाईनमध्ये आणखी भर पडत आहे. यामुळे शहरात प्रत्येक भागाला अघोषित वेळापत्रकाचा सामना करावा लागत आहे. १० ते १२ दिवस नळ नाही अशी अवस्था संपूर्ण शहराची झाली आहे.न्यायपालिकेसमोरच पाण्याचे लोटगुरूवारी जिल्हा न्यायालयापुढे जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन फुटली. यातून हजारो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे, सहा ते सात फूट उंच पाण्याचे कारंजे या ठिकाणी तासभर उडत होते. यानंतर पाईप लाईन बंद करण्यात आली. येथे खोदलेल्या नालीत पाणी साचल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Waterपाणी