शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

देश स्वतंत्र झाला, तरी ‘शकुंतला’ १०० वर्षांपासून पारतंत्र्यातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

शंभर वर्षांचा करार झालेला असल्याने १९४७ मध्ये देश स्वतंत्र होऊनही ही रेल्वे ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. या कंपनीच्या अखत्यारित असली तरी रेल्वे सुरू होती. शंभर वर्षांनंतर २२ जुलै २०१६ रोजी करार संपल्याने ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या ताब्यात येणे आवश्यक आहे; परंतु त्यासाठी केंद्र सरकारची उदासीनता अडथळा ठरत आहे. करार संपून पाच वर्षे लोटल्यावरही ‘शकुंतले’च्या पारतंत्र्याच्या बेड्या कायम आहेत.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही आला; पण जिल्ह्याची अस्मिता बनलेली शकुंतला रेल्वे अजूनही ब्रिटिशांच्या जोखडात पारतंत्र्य भोगतेय. ब्रिटिश कंपनीचा करार संपला तरी ही रेल्वे ताब्यात घेऊन तिचा विकास करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून थांबलेल्या ‘शकुंतले’च्या रुळांवर आता कचरा साचला आहे अन् तिच्या मार्गावरील १७ रेल्वेस्थानके एकटेपणा भोगत आहेत. किमान पुढच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत तरी शासनाने ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत घेऊन यवतमाळकरांचे गतवैभव पुन्हा एकदा लखलखीत करावे, अशी मागणी होत आहे.यवतमाळ जिल्ह्यातला दर्जेदार कापूस इंग्लंडमध्ये नेण्यासाठी ब्रिटिशांनी १९१६ मध्ये ही यवतमाळ-मूर्तिजापूर अशी धावणारी रेल्वे सुरू केली. या रेल्वेच्या देखरेखीचा कारभार लंडनमधील ‘क्लिक निक्सन’ या कंपनीकडे देण्यात आला होता. या कंपनीसोबत शंभर वर्षांचा करार झालेला असल्याने १९४७ मध्ये देश स्वतंत्र होऊनही ही रेल्वे ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. या कंपनीच्या अखत्यारित असली तरी रेल्वे सुरू होती. शंभर वर्षांनंतर २२ जुलै २०१६ रोजी करार संपल्याने ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या ताब्यात येणे आवश्यक आहे; परंतु त्यासाठी केंद्र सरकारची उदासीनता अडथळा ठरत आहे. करार संपून पाच वर्षे लोटल्यावरही ‘शकुंतले’च्या पारतंत्र्याच्या बेड्या कायम आहेत. अवघ्या एक-दीड वर्षात बदलणारे रेल्वेमंत्री या रेल्वेसाठी फार काही करताना दिसत नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असताना शकुंतलेच्या पारतंत्र्याची शताब्दी यवतमाळकरांना त्रासदायक ठरत आहे. 

शकुंतला रेल्वेचे अद्यापही भारत सरकारकडे हस्तांतरण झालेले नाही. ही रेल्वे ब्राॅडगेज करण्यासाठी आम्ही २००५ पासून पाठपुरावा करीत आहोत. रेल्वेचा रूट खराब असल्याने ती सध्या बंद आहे. क्लिक निक्सन कंपनीसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याची आमची मागणी प्रलंबित आहे. केंद्राच्या वित्त विभागाने मीटरगेज करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दीड हजार कोटीच्या निधीलाही मान्यता दिली होती; पण अद्याप पुढे काही झाले नाही. आता ही रेल्वे ब्राॅडगेज करण्यासाठी दीड हजार कोटींपेक्षाही जास्त निधी लागणार आहे.- भावना गवळी, खासदार

शकुंतलेची वैशिष्ट्ये- सर्वसामान्यांसाठी अत्यल्प दराची हक्काची वाहतूक सेवा- सुरुवातीला कोळशाचे इंजिन, नंतर डिझेल इंजिनचा वापर- ताशी २७ किलोमीटर इतकी वेगमर्यादा, नंतर हा वेग ताशी १५ किलोमीटर इतका कमी- मोळी विक्रेते, दूध विक्रेते, शेतमजूर यांच्यासाठी स्वस्त प्रवासाची सोय- ज्या अंतराचे एसटीचे भाडे शंभर रुपये आहे, त्या अंतरासाठी शकुंतलाचा दर १५ रुपये

 

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वेrailwayरेल्वे