शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निवासी डॉक्टरची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:56 IST

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असभ्य वागणूक देणाऱ्या ‘त्या’ निवासी डॉक्टरची आता चौकशी केली जाणार आहे.

ठळक मुद्देअसभ्य वर्तणूक : रॅगिंगनंतर ओपीडीतही हंगामा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असभ्य वागणूक देणाऱ्या ‘त्या’ निवासी डॉक्टरची आता चौकशी केली जाणार आहे.सदर डॉक्टरच्या वागणुकीमुळे अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागला. गरीब रुग्णांना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. एका पोलीस अधिकाºयासोबतही अतिशय अर्वाच्य भाषेत वाद घातला गेला. त्याचा व्हीडीओही व्हायरल होत आहे. त्यानंतरही ‘त्या’ डॉक्टरला संबंधित विभाग प्रमुख पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.रुग्णालयातील वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार घडला होता. यामध्येही हा डॉक्टर असल्याचे चौकशीतून पुढे आले. मात्र हा डॉक्टर एका संघटनेचा सचिव असल्याने त्याच्याविरूद्ध इतर विद्यार्थ्यांनी तक्रार देण्याची हिंमत केली नाही. तेव्हापासून या डॉक्टरची मनमानी वाढल्याचे बोलले जाते. २० डिसेंबरला चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात आणले होते. त्यावेळी जखमीचे बयाण नोंदविण्यासाठी गेलेल्या अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस अधिकाºयासोबतही डॉक्टरने वाद घातला. एवढेच नव्हे, तर अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केली.अशीच वागणूक शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रतिसाद फाऊंडेशनच्या सदस्यांना देण्यात आली. त्यांनी एका निराधार जखमी महिलेला रुग्णालयात आणले होते. तेव्हा असाच प्रकार घडला. प्रतिसाद फाऊंडेशनच्या सदस्यांनी डॉ. भगवान कांबळे यांची नावानिशी अधिष्ठात्यांकडे तक्रार केली. असभ्य वागणूक व अरेरावी करीत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी प्रतिसाद फाऊंडेशनने केली.डॉक्टरविरूद्ध सातत्याने तक्रारी येत असल्याने अखेर अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार यांनी चौकशी समिती गठित केली. या समितीत ‘ईएनटी’चे विभाग प्रमुख डॉ.सुरेंद्र गवार्ले, बधीरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दामोधर पटर्वधन, डॉ. पाशू शेख, डॉ. स्नेहलता हिंगवे, डॉ. शरद मानकर यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयYavatmalयवतमाळ