शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तुरीचे १३ कोटींचे चुकारे अडले

By admin | Updated: April 18, 2017 00:04 IST

नाफेडने जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख क्विंटल तूर खरेदी केली. मात्र या तुरीचे तब्बल १३ कोटींचे चुकारे अडले आहेत.

११ केंद्रांवर झाली खरेदी : चार केंद्र राहिले बंद, २२ एप्रिलपर्यंत खरेदीच्या मौखिक सूचना, शेतकरी धास्तावलेयवतमाळ : नाफेडने जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख क्विंटल तूर खरेदी केली. मात्र या तुरीचे तब्बल १३ कोटींचे चुकारे अडले आहेत. अशा परिस्थितीज तूर खरेदी केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहे. यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.जिल्ह्यात नाफेडने १५ केंद्रावर आतापर्यंत एक लाख ३० हजार क्विंटल तुरीची खरेदी केली. ही खरेदी ६५ कोटी ६५ लाख रूपयांच्या घरात आहे. खरेदी झालेल्या तुरीपैकी १३ कोटींचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. नाफेडने १५ एप्रिलपर्यंत तूर खरेदी केली. असे असलेतरी खरेदी केलेल्या तुरीपैकी २० मार्चपर्यंतच्या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. गत २५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे पैसे मिळाले नाही. आता २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तूर विकली त्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील की नाही असी धास्ती निर्माण झाली आहे. सोमवारी दुपारी धडकला आदेश१५ एप्रिलनंतर तूर खरेदी बंद करण्याचे पत्र नाफेडने पाठविले. यावर जिल्ह्यातील बाजार समितीच्या सभापतींनी आवाज उठविला. पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे याची कैफियत मांडण्यात आली. दोन महिने ही मदतवाढ देण्याची मागणी सभापतींनी केली. प्रत्यक्षात सात दिवसाची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. गुरूवारच्या घटनाक्रमानंतर तीन दिवसाचा अवधी लोटला. परंतु लेखी पत्रच आले नाही. यामुळे तूर खरेदीचा गोंधळ वाढला. जिल्ह्यातील १५ शासकीय तूर खरेदी केंद्रापैकी ११ केंद्रावर तूर खरेदी करण्यात आली. तर व्हीसीएमएसच्या चार केंद्रावर पत्राअभावी खरेदी बंद ठेवण्यात आली. यामध्ये यवतमाळ आणि बाभूळगावचा समावेश आहे. आर्णी आणि राळेगावमध्ये खरेदी बारदाण्या अभावी थांबली आहे. (शहर वार्ताहर) सायंकाळी आले पत्रनाफेडने १५ एप्रिलनंतर तूर खरेदी बंद करण्याचे पत्र बाजार समित्यांना दिले. गुरूवारी सात दिवसाची मुदवाढ मिळाल्याची माहिती पुढे आली. मात्र लेखी पत्र नव्हते. यामुळे शासकीय खरेदी केंद्र संभ्रमात सापडले होते. सोमवारी दुपारी खरेदी केंद्रांना २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदीची मुदतवाढ देण्यात आल्याचे पत्र धडकले. यामुळे दुपार नंतर शासकीय खरेदी केंद्राचा संभ्रम दुर झाला.