शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने केला पुजाऱ्याचा खून

By admin | Updated: July 3, 2015 00:11 IST

दारव्हा तालुक्याच्या गोखी येथील पुजाऱ्याचा खून एका चोरट्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सहा महिन्यानंतर रहस्य उलगडले : ठाणे जिल्ह्यातून अटक सोनखास : दारव्हा तालुक्याच्या गोखी येथील पुजाऱ्याचा खून एका चोरट्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरीच्या उद्देशाने मंदिर परिसरात फिरत असताना पुजाऱ्याने हटकले या क्षुल्लक कारणावरून हा खून करण्यात आला. पोलिसांनी घटनेच्या तब्बल सहा महिन्यानंतर यातील आरोपीला ठाणे जिल्ह्यातून अटक केली आहे. लखन देविदास राठोड (२२) रा. मोरगव्हाण ता. दारव्हा असे या आरोपीचे नाव आहे. गोखीच्या मारूती मंदिरात पुजारी म्हणून सेवारत सदाशिवराव गोविंदराव डहाके (६०) यांचा २९ डिसेंबर २०१४ रोजी खून करण्यात आला होता. घटनास्थळी सापडलेल्या एका मोबाईलवरुन पोलिसांनी मारेकऱ्याचा माग काढला. या मोबाईलमध्ये घाटंजी येथील राजेश राठोड या युवकाच्या नावाचे सीमकार्ड आढळले होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हा फोन लखन राठोड वापरत असल्याचे निष्पन्न झाले. पुजाऱ्याच्या खुनामागे लखनचाच हात असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. तो रोजगाराच्या शोधात ठाणे जिल्ह्यातील अमरनाथ येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून लाडखेडचे फौजदार रवी वावडे यांच्या नेतृत्वातील पथकाने बुधवारी तेथून लखनला अटक केली. घटनेच्या रात्री लखन गोखीच्या मंदिर परिसरात गेला होता. त्याने या मंदिराच्या ओट्यावर झोपण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजाऱ्याने या अनोळखी लखनला तेथे झोपण्यापासून रोखले होते. नेमका हाच राग मनात धरुन लखनने तेथे पडलेल्या काठीने पुजाऱ्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लखन याच्यावर लाडखेड पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेच्या रात्रीसुद्धा तो असाच चोरीच्या उद्देशाने गोखी परिसरात फिरत असावा व पुजाऱ्याला संशय आल्यानेच त्याला हटकले असावे, असा कयास पोलीस वर्तवित आहे. लखनकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपीला अटक करणाऱ्या पोलीस पथकात राजेश हनवतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वासू साठवणे, साहेबराव राठोड यांचा समावेश आहे. पुजाऱ्याच्या खुनातील आरोपीला अटक झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)