शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वणी उपविभागात मुसळधार पावसाने हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:59 IST

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यात हाहाकार उडाला आहे. पावसामुळे नदी-नाले फुगले असून निर्गुडा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने सोमवारी नागरिकांचे चांगलेच हाल झालेत.

ठळक मुद्देनदी, नाले झाले ओव्हरफ्लो : अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद, निर्गुडेने ओलांडली धोक्याची पातळी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यात हाहाकार उडाला आहे. पावसामुळे नदी-नाले फुगले असून निर्गुडा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने सोमवारी नागरिकांचे चांगलेच हाल झालेत.नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ४१.५० मि.मी.पावसाची नोंद झाली. पांढरकवडा तालुक्यात १३.८३ मि.मी., मारेगाव तालुक्यात ५६.८ मि.मी., तर झरी तालुक्यात २३.६ मि.मी.पावसाची नोंद झाली.वणी शहरालगतच्या नदीकाठावर वसलेल्या गणेशपूर पुलावरून दोन फुटापेक्षा अधिक पाणी असल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे. या गावलगतच्या अष्टविनायक सोसायटीपर्यंत निर्गुडा नदीच्या पुराचे पाणी पोहचले आहे. येथे अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तेथून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.ग्रामीण भागातील अनेक गावालगतची शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. घोन्सा मार्गावरील ड्रीमलॅन्ड सिटीलगत असलेला नाला व मोहर्ली येथील नाला दुथडी भरून वाहत असल्याने सोमवारी सकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प होती. नांदेपेरा परिसरातील बावनमोेडी, वाघाड्या, व गुंजच्या नाल्याला पूर आल्याने शेलू खुर्द, रांगणा, भुरकी, नांदेपेरा आदी गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सोमवारी सायंकाळीदेखील पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदी-नाल्यांच्या प्रवाहात वाढ झाली होती. झरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धानोरा, हिरापूर नवीन, हिरापूर जुने, राजूर, दुर्भासह अनेक गावांना लागून असलेल्या नाल्यांना पूर आल्याने या गावांचा संपर्कदेखील तुटला आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली आली असून पैैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाने उसंत घेतली नाही, तर नदी काठावरील धानोरा, हिरापूर, दुर्भा, विठोलीसह नदीकाठची गावे पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी पूरग्रस्त परिसरात दौैरा करून परिस्थितीची पाहणी केली. मारेगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.चार मार्गावरील बससेवा बंदगेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वणी आगाराला अनेक बसफेऱ्या सोमवारी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत. घोन्सा मार्गावरील ड्रीमलॅन्ड व मोहर्ली येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरून धावणाºया बसेस सोडण्यात आल्या नाहीत. मुकुटबन मार्गावरील पेटूर नाल्याला पूर आल्याने या मार्गावरदेखील सोमवारी बसेस धावल्या नाहीत. राळेगाव मार्गावर नांदेपेरा, वनोजा, मच्छिंद्रा येथील नाल्याला पूर असल्याने या मार्गावरील सर्वच वाहतूक ठप्प होती. शिरपूर मार्गावरील वारगावजवळ पुलावरून पाणी असल्याने कोरपना येथे जाणाऱ्या बसेस सोडण्यात आल्या नाहीत. परिणामी अनेक प्रवासी बसस्थानकावर खोळंबून होते. हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत.वणीतील शाळांना सुटीगेल्या २४ तासांत वणी परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी अनेक खासगी शाळांनी सुटी दिली, तर काही शाळांनी दुपार पाळीनंतर शाळा बंद ठेवल्या. रस्ते बंद असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या.सखल भागात पाणीवणी शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झालेत. गणेशपूर भागातील नदीकाठावर असलेल्या अनेक दुकानांमध्ये तसेच घरातदेखील पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील मोमिनपुरा परिसरातील विवेकानंद शाळेच्या आवारात पाणी शिरले.