शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तर सोडत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 22:14 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. उपरोक्त छायाचित्रांमधून त्याचे पुरावे मिळत आहे. परंतु त्यानंतरही जीवन प्राधिकरण यवतमाळ शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करीत नाही.

ठळक मुद्देसंतप्त यवतमाळकरांचा सवाल : नियोजनाच्या नावाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कृत्रिम पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. उपरोक्त छायाचित्रांमधून त्याचे पुरावे मिळत आहे. परंतु त्यानंतरही जीवन प्राधिकरण यवतमाळ शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करीत नाही. नियोजनाच्या नावाखाली प्राधिकरण शहरात खुलेआम कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत असल्याचे स्पष्ट होते. त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.यवतमाळ शहराच्या सभोवतालीच नव्हेतर मध्यभागातसुद्धा नागरिक भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. कुठे आठवड्यातून एक दिवस तर कुठे दहा-बारा दिवसातून एक दिवस पाणी मिळते आहे. तेही पूर्ण दाबाने मिळत नाही. पाणी भरणे होण्यापूर्वीच नळ निघून जातात, अशी स्थिती आहे. एक तर रात्री-बेरात्री नळ येतात. त्यात आठवड्यातून एकदा पाणी येत असल्याने साठवणूक करायची कशी, याचा प्रश्न शहरवासीयांपुढे निर्माण झाला आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा दिसत असताना प्राधिकरण आठवड्यातून किमान दोन दिवस नळ का सोडत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहर व जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाºया सत्ताधारी राजकीय नेत्यांनी प्राधिकरणाकडून तत्काळ पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा लेखाजोगा घेऊन त्यांना नियमित पाणीपुरवठ्याचे निर्देश द्यावे, बेंबळाचे पाणी नेमके केव्हापर्यंत मिळेल, त्यात खरोखरच काय अडचणी आहे, हेसुद्धा माध्यमांपुढे येऊन जाहीर करावे, अशी शहरवासीयांची मागणी आहे. मुबलक पाणी असूनही नागरिकांना कृत्रिम टंचाईचा सामना करायला लावणाऱ्या, नागरिकांचे फोन न उचलणाºया प्राधिकरण अभियंत्यांवर कारवाईची मागणी आहे.अमृत योजनेतील बेंबळाच्या पाण्याबाबत कुणीच अधिकृत बोले नायवतमाळ शहराच्या दृष्टीने अमृत योजना महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत बेंबळा प्रकल्पावरून शहरासाठी पाणी आणले जाणार आहे. परंतु या योजनेला निकृष्टतेचे ग्रहण लागले. पर्यायाने आॅक्टोबर-२०१९ ही योजनेची डेडलाईन तोंडावर येऊनही अद्याप कामाचा थांगपत्ता नाही. राजकीय दबावात जीवन प्राधिकरणाचे अभियंते लवकरच शहराला बेंबळाचे पाणी मिळेल, असे सांगतात. परंतु तारीख सांगत नाही. विशेष असे, हेच अभियंते खासगीत मात्र योजनेचे काही खरे नाही, असे बोलताना दिसतात. अमृत योजनेची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत अधिकृतपणे कुणीच समोर येऊन काही सांगण्यास तयार नाही. प्राधिकरणाचे अभियंतेही माध्यमांशी बोलताना ‘आॅफ द रेकॉर्ड’ हा शब्द वापरूनच पुढे बोलतात. राजकीय स्तरावरून सत्ताधारी पक्षाच्या नेते-पदाधिकाऱ्यांनी अद्याप तरी अमृत योजनेची सद्यस्थिती जाहीररित्या सांगण्याइतपत हिमत जुळविलेली दिसत नाही. जाहीर आवाहन करूनही कुणीच काही बोलत नसल्याने अखेर शहरातून १० मे रोजी आंदोलनाची तयारी केली जात आहे. पोलीस व गुप्तचर यंत्रणा या संभाव्य आंदोलनाच्या दृष्टीने ‘अलर्ट’ झाली आहे. संभाव्य आंदोलन हाणून पाडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या या यंत्रणेने ‘गनिमी काव्याने’ तर आंदोलन होणार नाही ना, याचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसते. ही यंत्रणा आंदोलनाची घोषणा करणाºयांवर सातत्याने वॉच ठेऊन आहे. आता पोलिसांच्या सतर्कतेनंतरही आंदोलन होते काय अन् जनता त्यात सहभाग घेते काय याकडे नजरा लागल्या आहेत.प्राधिकरण अभियंत्यांचा कॉलला ‘नो रिस्पॉन्स’अमृत योजनेची नेमकी स्थिती काय, धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा दिसत असताना तो नियमित सोडला का जात नाही, नेमक्या काय अडचणी आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना ‘कॉल’ केला. मात्र प्रश्नांना उत्तरे द्यावी लागेल, या भीतीने त्यांनी तो ‘रिसिव्ह’ केला नाही. जनतेला तर प्रत्यक्ष जाऊनही अभियंत्यांचे दर्शन होत नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई