शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांना सुविधाच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:45 IST

Tipeshwar Sanctuary Yawatmal News आतापर्यंत लाखाे रुपयांचा खर्च करुनही टिपेश्वर अभयारण्यात सुविधांची वानवा आहे. 

ठळक मुद्देवाघांचे दर्शन, पर्यटकांची होतेय गर्दी

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: घाटंजी येथून अवघ्या २५ किमीवरील टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन होते. दुर्मिळ वन्य प्राणीही दृष्टीस पडतात. मात्र आतापर्यंत लाखाे रुपयांचा खर्च करुनही टिपेश्वर अभयारण्यात सुविधांची वानवा आहे. अभयारण्यात दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पर्यटक निधी म्हणून लाखो रुपयांचा निधीसुद्धा प्राप्त होतो. मात्र हा निधी विकास कामांवर खर्च न करता मेळघाट येथे पाठविला जात आहे. तालुक्यातील तिपाई देवीच्या नावावरून टिपेश्वर अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. तेथे टेकडीवर तिपाईचे मंदिर आहे. या अभयारण्याचे क्षेत्र तब्बल १४ हजार ८३२ हेक्टरमध्ये विखुरले आहे. दक्षिणेस तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील डोंगरदरे आहे. हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे. वघारा येथे नैसर्गिक धबधबा आहे. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे अभयारण्य महत्वाचे ठरते. येथे वाघांचा मुक्त संचार असतो. मात्र उदासीन अधिकाऱ्यांमुळे विकास होताना दिसत नाही. लाखोंचा खर्च होऊनही सुविधांचा अभाव आहे. सुन्ना व माथनी गेटजवळ शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. विश्रामगृहात सुविधा नाही. जंगलात पाण्याची सुविधा नाही. बसविलेले सोलर लाईट बंद पडले. लाखोंचे वृक्षारोपणही निष्फळ ठरले.  त्यामुळे पर्यटक निराश आहेत. 

जनवन योजनेच्या निधीची विल्हेवाट  विकासासाठी डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा निधी दिला जातो. मात्र हा निधी चुकीच्या पद्धतीने खर्च केला जात आहे. त्यामुळे पालकमंत्री व मेळघाट येथील मुख्य वनाधिकाऱ्यांनी अभयारण्याला भेट देण्याची गरज आहे. त्यांनी समितीच्या निधी खर्चाची पाहणी करणे अपेक्षित आहे. तसेच अभयारण्यातील सर्व वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य