शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

‘त्यांची’ प्राणज्योत तेवतेय रक्ताच्या थेंबावर

By admin | Updated: June 14, 2014 02:34 IST

रक्तदान हे जीवनदान म्हटले जाते. रक्ताचा संचय करणे अशक्य आहे.

रूपेश उत्तरवार यवतमाळरक्तदान हे जीवनदान म्हटले जाते. रक्ताचा संचय करणे अशक्य आहे. मात्र मर्यादित कालावधीसाठी हे रक्त टिकवून ठेवता येते. असे असले तरी गरजवंताच्या तुलनेत ऐच्छीक रक्तदात्यांंची संख्या नगण्य आहे. त्यामुळे रक्ताचा भिषण तुटवडा निर्माण झाला आहे. रक्त पुरवठ्यावर जीवन विसंबून असणाऱ्या रूग्णांच्या जीवनाची नाळ टांगनिला लागली आहे. यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऐच्छीक रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच मागणी कित्येक पटींनी वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत रक्त पुरवठयाची संख्या सर्वात कमी आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तदानाचे कॅम्प, यासोबतच एनसीसी आणि अभियांत्रीकी महाविद्यालयासह अनेक व्यक्ती स्वत:हून रक्तदान करतात आणि रक्त पेढीतील रक्तसंचयात भर पडते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी असते. उन्हाळ्यात ही संख्या रोडावते. यातूनच रक्त तुटवड्याचा भिषण प्रश्न निर्माण होतो.प्लाझमा सेंटरच नाहीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातिल रक्त पेढीतून होलब्लडचा पुरवठा करण्यात येतो. मात्र रूग्णाला रेड सेल्स प्लाझ्मा लागल्यास तो रूग्णालयात मिळत नाही. त्यासाठी खासगी रक्तपेढीतच धाव घ्यावी लागते. प्लेटलेट या ठिकाणावरून मिळत नाही. याच संधीचा फायदा घेत खासगी रक्तपेढीधारक गरजवंतांना लुटतात. खासगी रक्त पेढीतून प्लाझ्मा, होेलब्लड, लागल्यास त्याला पर्यायी ब्लड उपलब्ध करून द्यावे लागते. त्यानंतर ठरावीक दरात रक्त पिशवी दिली जाते. मात्र पर्यायी रक्त उपलब्ध नसल्यास रक्त पिशवीचा दर दुप्पट असतो. त्यासाठी जादा पैसे मोजले जातात. गरजवंताचा नाईलाज असतो.राज्य संक्रमन परिषदेची मान्यताब्लड कम्पोनंट्स सेप्रेशन युनिट उघडण्यासाठी राज्य रक्त संक्रमन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याचा नकाशा मंजूर झाला आहे. त्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सात लाख रूपये यासाठी मंजूर करण्यात आले आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्याला ६० लाखांची यंत्रसामुग्री मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात ब्लड कम्पोनंटस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळण्यास मदत होणार आहे. यातून गरजवंतांची होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे. सिकलसेल, थॅलेसिमीयाचे रूग्ण संकटातविदर्भात सिकलसेल आणि थॅलेसिमीयाचे सर्वाधिक रूग्ण यवतमाळ जिल्हयात आहे. या रुग्णांना वारंवार रक्ताची गरज भासते. असे एक हजार रूग्ण रजिस्टर करण्यात आले आहे. रक्तपेढीतील तुटवड्याने त्यांच्या आयुष्याची दोर मात्र टांगणीला लागली आहे. रिफ्रेशमेंटसाठी केवळ १० रूपयेऐच्छिक रक्तदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उर्जा मिळावी म्हणून रिफ्रेशमेंटसाठी केवळ १० रूपये दिले जातात. गत २० वर्षांपासून हा दर कायम आहे. त्यामुळे रक्तदानास येणाऱ्या दात्यांना त्याच्या मोबदल्यात पौष्टीक घटकच मिळत नाही.अशी आहे रक्त पेढीची स्थितीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी मिळणारे रक्त अपुरे पडत आहे.सन २०११ मध्ये चार हजार ६५० गरजवंतांना रक्त पुरविण्यात आले. त्या मोबदल्यात तीन हजार १६ व्यक्तींनी रक्तदान केले. त्यासाठी ९६ कॅम्प घेण्यात आले. सन २०१२ मध्ये चार हजार ९७२ इच्छुकांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. त्या बदल्यात तीन हजार ४३८ व्यक्तींनी रक्तदान केले. यावर्षी ८७ कॅम्प घेण्यात आले.सन २०१३ मध्ये सात हजार २८३ गरजवंतांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. त्याबदल्यात तीन हजार ३४२ व्यक्तीेंनी रक्तदान केले. यावेळी ११२ कॅम्प घेण्यात आले. सहा महिन्यात चार हजार ४३२ व्यक्तींना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. ३३ कॅम्प घेण्यात आले. सध्याच्या स्थितीत रक्तपेढीत फार मोठा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.