शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधील कोल्लम येथे जगातील सर्वांत मोठी जलक्रीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2022 08:00 IST

Yawatmal News भारतातील पहिली बोट रेस आणि जगातील सर्वांत मोठी जल क्रीडा स्पर्धा अशी ओळख असलेल्या केरळ चॅम्पियन बोट लीग स्पर्धेची अंतिम फेरी आज, शनिवारी केरळमधील कोल्लम येथील प्रसिद्ध प्रेसिडेंट ट्राॅफी बोट रेसवर रंगणार आहे.

ठळक मुद्देआयपीएलच्या धर्तीवर रंगतेय सीबीएल

विशाल सोनटक्के

त्रिवेंद्रम  : भारतातील पहिली बोट रेस आणि जगातील सर्वांत मोठी जल क्रीडा स्पर्धा अशी ओळख असलेल्या केरळ चॅम्पियन बोट लीग स्पर्धेची अंतिम फेरी आज, शनिवारी केरळमधील कोल्लम येथील प्रसिद्ध प्रेसिडेंट ट्राॅफी बोट रेसवर रंगणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण केरळमध्ये मोठी उत्सुकता असून, बोट रेसच्या देश-विदेशांतील चाहत्यांनीही कोल्लम येथे गर्दी केली आहे.

पावसाळ्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दरवर्षी केरळचा शांत बॅक वाॅटर बदललेला असतो, कारण येथे ही स्पर्धा इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर रंगलेली असते. यंदा या स्पर्धेसाठी अभूतपूर्व उत्साह आहे. कारण कोविडमुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर ही स्पर्धा रंगते आहे. या स्पर्धेच्या १२ पैकी ११ वीकेंड शर्यती संपल्या असून, अंतिम सामना आज, शनिवारी नेहरू बोट रेस येथे सुरू होत आहे. एकूण सात कोटींचे बक्षीस असलेल्या या स्पर्धेमध्ये ट्राॅपिक टायटल ८८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर मायटी बाेर्स दुसऱ्या, रॅंगिग रोवर्स तिसऱ्या स्थानावरून असून, विविध भागातील नऊ संघही २०२२ बोट लीग जिंकण्यासाठी झुंज देणार आहेत.

स्पर्धेचा ट्रॅक साधारण एक किलोमीटर लांबीचा असून, ही बोट स्पर्धा केरळच्या शेती संस्कृतीचा अविभाज्य भाग समजला जातो. या स्पर्धेमुळे केरळच्या पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असून, नागरिकांत स्पर्धेमुळे सामाजिक एकोप्याची भावना निर्माण झाली आहे. या सीबीएल स्पर्धेमुळे एखाद्या पारंपरिक सणासारखे वातावरण बँक वाॅटरच्या काठावर निर्माण झाले असून, रोव्हिंगचे कौशल्य आणि अचूक समन्वय याची अनुभूती घेण्यासाठी केरळकर नागरिक सज्ज झाले आहेत.

नऊ चॅम्पियन स्नेक बाेटिंगकडे लक्ष

चॅम्पियन बोट लीग २०२२ या स्पर्धेला ४ सप्टेंबरला प्रारंभ झाला असून, आज, शनिवारी अंतिम सामना होत आहे. साधारण २८०० रोअर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. साधारणपणे एका बोटीमध्ये ९५ रोअर्स असतात. तर ७ ते १० स्टॅन्डी असतात. स्पर्धेचा एक किमीचा ट्रॅक कोणती बोट सर्वांत कमी वेळेत पूर्ण करते, यावर विजेता ठरतो.

टॅग्स :Keralaकेरळ