शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांचे वाहन उलटले; सहा जागीच ठार, १२ जखमी

By अविनाश साबापुरे | Updated: January 16, 2024 16:12 IST

पोहरादेवीकडे जाताना पुसदच्या नागरिकांचा अपघात

पुसद (यवतमाळ) : नवस फेडण्यासाठी पोहरादेवीकडे निघालेले भाविकांचे वाहन नाल्यात उलटून अपघात झाला. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. तर अन्य १२ प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात मंगळवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास बेलगव्हाण गावाजवळ घडला. या घटनेमुळे पुसद परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातामध्ये ज्योतीबाई नागा चव्हाण (६०), उषा विष्णू राठोड (५०), दोघेही रा. जवाहरनगर धुंदी, पार्वतीबाई रमेश जाधव (५५) रा. वसंतपूर, वसराम देवसिंग चव्हाण (६५) रा. सिंगरवाडी धानोरा, लिलाबाई वसराम चव्हाण (६०) सिंगरवाडी धानोरा, सावित्रीबाई गणेश राठोड (४५) जवाहरनगर धुंदी हे सहा जण ठार झाले आहे. तर जखमींमध्ये राज राहुल चव्हाण (५) रा. सेवानगर, आशा हूलसिंग चव्हाण (५०) रा. सेवानगर, दर्शन संतोष पवार (७) रा. सेवानगर, गणेश राठोड रा. सेवानगर, प्रथमेश अर्जुन राठोड (७) रा. पांढुर्णा, गाडी चालक ज्ञानेश्वर गणेश राठोड (२५) यांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी पुसद तालुक्यातील नागरिक निघाले होते. पुसद तालुक्यातील जवाहरनगर धुंदी येथील गणेश लच्छीराम राठोड यांच्या घरी आधी सर्वजण जमले. त्यानंतर सकाळी ११ ते ११:३० वाजताच्या सुमारास धुंदी येथून ते पोहरादेवीकडे निघाले. एमएच २९-३१७२ क्रमांकाच्या लाल रंगाच्या ॲपे वाहनातून जवळपास १८ जण नवस करण्यासाठी पोहरादेवी येथे जात होते. सदर गाडी ही भरधाव वेगात जात असताना बेलगव्हाणजवळ चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने ही गाडी नाल्यात पलटी झाली. या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले असून १२ जण जखमी झालेत. 

सर्व जखमींवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यातील प्रथमेश अर्जुन राठोड, राज राहुल चव्हाण यांना तातडीने नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे. उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आमदार इंद्रनील नाईक यांनी जखमींची व नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वना केली.

टॅग्स :Accidentअपघात