शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कापड व्यापाऱ्याने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही घातला लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या सहायक निरीक्षकाने या व्यापाऱ्यासोबत बालाजी दर्शन केले. या दर्शनाला जाण्यापूर्वी चार लाख व दर्शनावरून आल्यानंतर पाच लाख असे नऊ लाख रुपये दिले. अतिशय प्रेमळ, मनमिळावू व अधिकाऱ्यांची आज्ञा झेलणारा व्यापारी असल्याने त्याच्यावर मोठा विश्वास होता. यातूनच सहायक निरीक्षकाने जमविलेल्या मायेतील पैसे त्या व्यापाऱ्याला दिले. याहीपेक्षा अधिक सख्य हायवे ट्रॅपमध्ये असलेल्या सहायक निरीक्षकासोबत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रसिद्ध असे साडी सेंटर चालविणारा व्यापारी अचानक परिवारासह गायब झाला आहे. याला आता एक महिना होत आहे. या व्यापाऱ्याने क्रिकेटच्या सट्ट्यात मोठा पैसा गुंतविला होता. त्यातून तो बरबाद झाला. मात्र त्याने गाव सोडण्यापूर्वी आपल्या अनेक मित्रांकडून कर्जाऊ रकमा घेतल्या. त्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. वरकमाईमुळे गब्बर बनलेले हे अधिकारी, कर्मचारी अशा व्यापाऱ्याच्या माध्यमातून गुंतवणुकीचा प्रयत्न करतात. पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या सहायक निरीक्षकाने या व्यापाऱ्यासोबत बालाजी दर्शन केले. या दर्शनाला जाण्यापूर्वी चार लाख व दर्शनावरून आल्यानंतर पाच लाख असे नऊ लाख रुपये दिले. अतिशय प्रेमळ, मनमिळावू व अधिकाऱ्यांची आज्ञा झेलणारा व्यापारी असल्याने त्याच्यावर मोठा विश्वास होता. यातूनच सहायक निरीक्षकाने जमविलेल्या मायेतील पैसे त्या व्यापाऱ्याला दिले. याहीपेक्षा अधिक सख्य हायवे ट्रॅपमध्ये असलेल्या सहायक निरीक्षकासोबत होते. मंडलने सगळ्यांनाच बंडल देऊन पैसा गोळा केला. ट्रॅपमध्ये असलेल्या अधिकाऱ्याने जवळपास आठ  लाख रुपये त्या व्यापाऱ्याला दिले. पोलीस मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यानेही २५ लाख एवढी रक्कम या व्यापाऱ्याला दिली. यासोबतच या व्यापाऱ्याने गाव सोडण्याअगोदर शहरातील एका दबंग  कुटुंबातील दोन भाऊ व एका पुतण्याला ५० लाखांना गंडविले आहे. अवैध मार्गाने आलेला पैसा हातचा निघून गेला. याची खंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना आहे. मात्र कायदेशीर मार्गाने ते काहीच करू शकत नाही. लाखो रुपयांचा व्यवहार त्या व्यापाऱ्यासोबत झाला. पोलिसांची अवैध धंद्यांची सलगी नवीन नाही. साडी व्यावसायिकाच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट सट्ट्यासह इतरही अवैध व्यवसायात गुंतवणूक केली. 

चोरीचा मामला अन्‌ आवाजच दबला - एक प्रकारची ही सावकारी बिनबोभाटपणे सुरू होती. आता ज्याच्या भरवशावर गुंतवणूक केली, तोच गायब झाला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी सोईचे पोस्टिंग मिळविण्यासाठी हा पैसा गुंतविला होता. चोरीचा मामला असल्याने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवाज दाबण्याशिवाय पर्याय नाही. मात्र याची चर्चा पोलीस वर्तुळात चांगलीच रंगत आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी